सध्या इराण आणि इस्रायल या दोन देशांत तणावाची स्थिती आहे. हमासचा नेते इस्माईल हनियाह यांच्या हत्येमुळे तेहरान हा देश चांगलाच आक्रमक झाला आहे. तेहरानने हनियाह यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे सांगितले आहे. हनियाह यांच्या हत्येमागे इस्रायल या देशाचा हात असल्याचा दावा तेहरानने केला आहे, अशा स्थितीत इंडियन नॉस्ट्रॅडॅमस अशी ओळख असलेल्या कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे.
आखाती प्रदेशातील वातावरण तणावग्रस्त
लष्करी कमांडर फुआद शुकर यांच्या मृत्यूमुळे तेल अविवने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यामुळे दुसरीकडे तेल अविवचे लेबनॉनशी वाद चालू आहेत. इस्रायलव्याप्त गोलान हाईट्स या प्रदेशातील फुटबॉलच्या मैदानावर अचाकन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 12 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेदेखील आखाती प्रदेशातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगापुढे तिसऱ्या महायुद्धाची भीती उभी ठाकली आहे. असे असताना कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे.
कुशल कुमार यांनी केले युद्धाचे भाकित
इराण आणि इस्रायल यांच्यातील याच तणावाच्या स्थितीवर तसेच मध्य पूर्वेतील वेगवेगळ्या प्रादेशिक संघर्षामुळे तिसरे महायुद्ध छेडले जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ही तणावाची स्थिती वाढत गेल्यास तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते असे म्हटले जाते. त्यामुळेच संपूर्ण जग सध्या तणावात आहे. असे असताना ज्योतिषी असल्याचा दावा करणाऱ्या कुशल कुमार यांनी महायुद्धाचे भाकित केले आहे. येत्या 4 किंवा 5 ऑगस्टला युद्धाची सुरुवात होऊ शकते, असं त्यांनी म्हटलंय.
...म्हणून होऊ शकते युद्धाला सुरुवात
कुशल कुमार यांनी सांगितल्यानुसार सध्या दोन रशियन आणि दोन चिनी लढाऊ विमान (बॉम्बर्स) अलास्काच्या जवळपास हवेत फिरत आहेत. दुसरीकडे क्यूबाकडून लष्करी सराव चालू आहे. तसेच रोमानियातील स्थितीमुळे संपूर्ण आशिया तसेच युरोपीय प्रदेशात युद्धाला सुरुवात होऊ शकते.
याआधीही केला होता महायुद्धाचा दावा
कुशल कुमार यांनी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता पहिल्यांदाच व्यक्त केलेली नाही. याआधीही त्यांनी या वर्षाच्या 18 जून पासून जागतिक संघर्षाला सुरुवात होईल. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल, असा दावा त्यांनी केला होता. मात्र महायुद्ध न झाल्याने त्यांनी पुन्हा 26 ते 28 जुलैदरम्यान तिसरे महायुद्ध चालू होईल, असा दावा केला होता. पण जोतिषी कुशल कुमार यांचा हा दावादेखील फोल ठरला होता. कुशल कुमार हे मुळचे हरियाणाचे आहेत. ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून भविष्यवाणी करतात. सोशल मीडियावर ते चांगलेच प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा :
Most Expensive Coins : जगातील सर्वात महागडी 'नाणी' कोणती? किंमत एकूण व्हाल थक्क