World Richest Beggar : जगात असे अनेक भिकारी (Beggar) आहेत, की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. तर काही भिकारी करोडपती (millionaire) देखील आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. तुम्हाला जगातील सर्वांत श्रीमंत भिकारी माहित आहे का? या भिकाऱ्याकडे मुंबईतील फ्लॅट्सपासून दुकानांपर्यंत सर्व काही आहे. या भिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तसेच या भिकाऱ्याचे मासिक उत्पन्न सामान्य पगारदार व्यक्तीपेक्षा खूप जास्त आहे. जाणून घेऊयात जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याबद्दल माहिती.
भरत जैन हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी
भिकारी करोडपती होऊ शकतो, असा तुम्ही कधी विचार केला आहे का? पण हे होऊ शकतं. कारण, मुंबईत राहणारा भरत जैन (Bharat Jain) हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी आहे. या भिकाऱ्याकडे 8 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. भरत जैन यांची मासिक कमाई जवळपास 80 हजार रुपये मानली जाते. या भिकाऱ्याचे मुंबईत फ्लॅट आणि दुकाने आहेत. हा भिकारी मुंबईत 10 ते 12 तास भीक मागतो. यातून तो दररोज सुमारे तीन हजार रुपये कमावतो.
भरतकडे असणाऱ्या फ्लॅटची किंमत 2 कोटी
भरतकडे असणाऱ्या फ्लॅटची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. एवढेच नाही तर त्यांना दुकानांचे दरमहा सुमारे 30 ते 40 हजार रुपये भाडेही मिळते. त्यांची दोन मुले आहेत जी कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहेत. या भिकाऱ्याने अनेक ठिकाणी मोठ्या रकमेची गुंतवणूकही केली आहे. यातून ते कमाईही करतात. एवढी संपत्ती असूनही भरत आजही छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आझाद मैदानावर भीक मागतो. तो परळ परिसरात राहतो. भरतचे कुटुंब स्टेशनरीचे दुकान चालवते. यातून ते कमाईकरतात. भरतच्या कुटुंबीयांनी त्याला भीक मागण्यास मनाई केली आहे. तरीही त्याचे भीक मागणे सुरुच आहे.
भरताशिवाय देशात असे अनेक भिकारी आहेत, ज्यांची संपत्ती लाखोंच्या घरात आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी काही करोडपती असणाऱ्या भिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलची माहिती
सरवातिया देवी
श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत सरवातिया देवी यांचा समावेश होतो. भीक मागून ती महिन्याला सुमारे 50 हजार रुपये कमावते. एका माहितीनुसार, त्यांनी जीवन विमाही काढला आहे. ती 36 हजार रुपये वार्षिक प्रीमियम भरते.
लक्ष्मी दास
लक्ष्मी दास यांनी वयाच्या 16 व्या वर्षी भीक मागायला सुरुवात केली. भीक मागून ती दरमहा 30 हजार रुपये कमावते.
संभाजी काळे
संभाजी काळे हे मुंबईत भीक मागतात. ते खारजवळ भीक मागताना दिसतात. एका माहितीनुसार, त्यांच्या बँक खात्यात सुमारे दोन लाख रुपये जमा झाले होते. ते प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायही करतात.
कृष्णकुमार गिते
करोडपती भिकाऱ्यांमध्ये कृष्णकुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे 5 लाखांहून अधिक किंमतीची अपार्टमेंट आहेत. ते मुंबईत भीक मागतात.
महत्वाच्या बातम्या: