लंडन : इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं, मधल्या काळात अनेकांची झोप उडवणारं पेगॅसस स्पायवेअर (Pegasus spyware) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या स्पायवेअरचा वापर करुन दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम (Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum) यांने त्याच्या आधीच्या पत्नीवर, प्रिन्सेस हाया (Princess Haya) हिच्यावर पाळत ठेवल्याचा ठपका लंडनच्या उच्च न्यायालयाने ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दोन मुलांची मालकी कोणाकडे ठेवायची यासंबंधी न्यायालयात खटला सुरु असताना ही पाळत ठेवल्याचं स्पष्ट झालंय.
शेख मोहम्मदने आपल्या अधिकारांचा वापर हा अवैध्यरित्या केला असल्याचं लंडनच्या उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीशांनी स्पष्ट केलं.
दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याने त्याची आधीची पत्नी प्रिन्सेस हाया बिंत अल हुसेन आणि तिच्याशी संबंधित पाच लोकांवर पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली होती. शेख मोहम्मद हा ब्रिटनचा आखाती देशांमधील निकटवर्तीय आणि सर्वात चांगला मित्र असल्याचं समजतंय.
शेख मोहम्मदने प्रिन्सेस हाया, तिचे दोन वकील आणि इतर दोघांवर पाळत ठेवली होती. प्रिन्सेस हायाची एक वकील असलेल्या फियोना शेकल्टन यांना त्यांच्या इस्त्रायलमधील मित्राकडून याची माहिती मिळाली आहे. हा इस्त्रायली व्यक्ती एनएसओ या कंपनीसाठी काम करतोय.
प्रिन्सेस हायाचा फोन गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये 11 वेळा हॅक करण्यात आला होता. दुबईच्या प्रशासनाला हा आदेश शेख मोहम्मदने दिला असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणाचा परिणाम लंडनच्या न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेख मोहम्मदसमोरील अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी या स्पायवेअरचा वापर करुन आपल्याच देशाच्या पत्रकार, राजकीय नेते आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले आणि हेरगिरी केला असल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये भारत सरकारचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतातील 40 हून अधिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर या स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचा संशय आहे. पेगॅससच्या माध्यमातून गोपनीय असलेल्या व्हॉट्सअॅपच्या मेसेजवरही नजर ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.
महत्वाच्या बातम्या :
- Nobel Prize 2021 For Chemistry : बेंजमिन लिस्ट आणि डेविड डब्ल्यूसी मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल
- Facebook मुलांना बिघडवणारे, समाजात फूट पाडणारे आणि लोकशाहीला दुर्बल करणारे; व्हिसल ब्लोअरचा आरोप
- Facebook Stock : काही तासातच मार्क झुकरबर्गने गमावले 45,555 कोटी रुपये, श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं