Dubai Ruler Divorce Case: दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम (Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum) याला त्याच्या सहाव्या पत्नीला म्हणजे प्रिन्सेस हाया (Princess Haya) हिला तब्बल साडेपाच हजार कोटी रुपये इतकी भलीमोठी रक्कम द्यावी लागणार आहे. लंडन कोर्टाने हा निर्णय सुनावला असून  शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याला त्याच्या 14 वर्षाच्या अल जलीला आणि 9 वर्षाच्या जायद या मुलांच्या भविष्यासाठी 290 मिलियन पाऊंड बँक गॅरंटी द्यावी लागणार आहे. 


शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुमची सहावी पत्नी असलेली प्रिन्सेस हाया ही 2019 साली दुबई सोडून पळाली होती आणि तिने ब्रिटनमध्ये आश्रय घेतला होता. या दोघांचा हा घटस्फोट जगातल्या महागड्या घटस्फोटांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतंय.  


पत्नी आणि मुलांना वेगवेगळे पैसे द्यावे लागणार
लंडन हायकोर्टाने दिलेल्या आदेशात सांगितलं आहे की  शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याने तिच्या सहाव्या पत्नीला म्हणजे प्रिन्सेस हायाला साडेपाच हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी. तसेच त्यांच्या 14 वर्षाच्या अल जलीला आणि 9 वर्षाच्या जायद या मुलांच्या भविष्यासाठी 290 मिलियन पाऊंडची बँक गॅरंटी द्यावी. ही एकूण रक्कम साडेपाच हजार कोटी रुपयांच्या वर जाते. 


पेगॅसस स्पायवेअरचा वापर करुन दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम यांने त्याच्या सहाव्या पत्नीवर, प्रिन्सेस हाया हिच्यावर पाळत ठेवल्याचा ठपका लंडनच्या उच्च न्यायालयाने ठेवला होता. विशेष म्हणजे त्यांच्या दोन मुलांची मालकी कोणाकडे ठेवायची यासंबंधी न्यायालयात खटला सुरु असताना ही पाळत ठेवल्याचं स्पष्ट झालं होतं. दुबईचा शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम याने त्याची आधीची पत्नी प्रिन्सेस हाया बिंत अल हुसेन आणि तिच्याशी संबंधित पाच लोकांवर पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली होती. शेख मोहम्मद हा ब्रिटनचा आखाती देशांमधील निकटवर्तीय आणि सर्वात चांगला मित्र असल्याचं समजतंय.


महत्त्वाच्या बातम्या :