ट्रम्प यांनी रविवारी सकाळी एक व्हिडीओ ट्वीट केला, ज्यात ते सीएनएनचा लोगो चेहऱ्यावर लावलेल्या एका व्यक्तीला मारताना दिसत आहेत. याआधी शनिवारी अमेरिकन नागरिकांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांनी मीडियावर जोरदार हल्ला केला होता. शिवाय मीडियाला 'बोगस' म्हटलं होतं. त्यांनी #FraudNewsCNN आणि #FNN टॅगसह हा व्हिडीओ पोस्ट केला.
काय आहे व्हिडीओ?
28 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प रिंगजवळच असलेल्या एका व्यक्तीला जमिनीवर लोळवून त्यांना मारत असल्याचं दिसत आहेत. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सीएनएनचा लोगो आहे. व्हिडीओच्या शेवटी सीएनएनचा लोगो उजव्या कोपऱ्यात दिसतो आणि त्यावर "एफएनएन: फ्रॉड न्यूज नेटवर्क" लिहिलेलं आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/881503147168071680
काहींनी याचा मूळ व्हिडीओही रिप्लायमध्ये पोस्ट केला आहे. ज्या व्यक्तीला ड्रम्प मारहाण करत आहेत, ते डब्ल्यूडब्ल्यूईचे प्रमोटर विन्स मिकमॅन आहेत. मिकमॅन ट्रम्प यांचे मित्र आहेत. व्हिडीओमध्ये दाखवलेला भाग रेसलमेनिया 23 मधील आहे. मिकमॅन यांनी फेब्रुवारीमध्ये पत्नी लिंडा मिकमॅन यांची भेट घेतली होती.
दुसरीकडे, सीएनएने पलटवार करताना म्हटलं की, ट्रम्प यांचं वागणं त्यांच्या पदाला अनुकूल नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पत्रकारांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहेत. आम्ही आमचं काम करत राहणार आणि त्यांनीही आपलं काम सुरु करावं, असं परिपत्रकच चॅनलने जारी केलं आहे.
पाहा व्हिडीओ