Finland Wants To Join NATO: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारने रविवारी जाहीर केले की, त्यांचा देश युक्रेन आणि रशियन युद्धादरम्यान, पाश्चात्य लष्करी संघटना नाटोमध्ये सामील होण्यास इच्छुक आहे. नॉर्डिक देशाच्या या घोषणेमुळे 30 सदस्यीय नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. हेलसिंकी येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टो आणि पंतप्रधान सना मारिन यांनी ही घोषणा केली.


येत्या काही दिवसातच फिनलँडच्या संसदेत या निर्णयाला पाठिंबा दिला जाऊ शकतो. संसदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, फिनिश सरकार कदाचित पुढील आठवड्यात ब्रुसेल्समधील नाटो मुख्यालयात औपचारिक सदस्यत्व अर्ज सादर करेल. तत्पूर्वी रशियाने म्हटले आहे की, फिनलँडचा नाटोमध्ये प्रवेश हे एक धोक्याचं लक्षण आहे, ज्यावर ते लवकरच प्रतिक्रिया देणार. मात्र फिनलँडच्या या पावलावर ते कशा प्रकारे प्रतिक्रिया देणार, हे रशियाने अद्याप स्पष्ट केलं नाही.


फिनलँडने नाटोचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न केले सुरू


स्वीडनसोबतच फिनलँडनेही नाटोचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनवर हल्ल्यानंतर रशिया लगतचे बरेच देश नोटोचे सदस्यत्व घेण्यासाठी धडपड करत आहेत. या युद्धावरून फिनलँड आणि स्वीडनने त्यांच्या तटस्थतेच्या धोरणावर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. दोन्ही देशांचे लोक नाटोमध्ये सामील होण्याच्या बाजूने आहेत. दरम्यान, युरोपियन युनियन सदस्य बाह्य हल्ल्याच्या प्रसंगी एकमेकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत. मात्र हे आश्वासन बहुतांशी कागदावरच आहे. युरोपियन युनियनच्या सामूहिक संरक्षण धोरणापेक्षा NATO ची क्षमता अधिक मजबूत आहे.


एर्डोगन यांचा फिनलँड आणि स्वीडनला विरोध 


तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्डोगन फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील होण्याच्या विरोधात आहेत. फिनलँड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील होण्यास तुर्कीचे समर्थन नाही, असे एर्डोगन म्हणाले आहेत. एर्डोगन यांच्या म्हणण्यानुसार, हे नॉर्डिक देश कुर्दिश लढवय्यांचे समर्थन करतात, ज्यांना तुर्की दहशतवादी मानतो.


इतर महत्वाच्या बातम्या: 


'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळ, इंग्लंडच्या रोजगार न्यायाधिकरणाने दिला निर्णय


Highest Temperature in Pakistan : पाकिस्तानमध्ये सुर्याचा प्रकोप, जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद