Donald Trump : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली आहे. याशिवाय आपत्कालीन गर्भनिरोधक औषधांची मागणीही झपाट्याने वाढत आहे.अमेरिकन वृत्तपत्र यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, ही औषधे बनवणारी कंपनी विस्पने म्हटले आहे की, 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान आपत्कालीन गर्भनिरोधक औषधांच्या विक्रीत 1 हजार टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत, ही औषधे खरेदी करणाऱ्या लोकांच्या संख्येत 1650 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय गर्भपाताच्या औषधांच्या विक्रीतही 600 टक्के वाढ झाली आहे. ट्रम्प निवडणूक जिंकल्याने महिलांना त्यांचे गर्भपाताचे अधिकार अधिक कडक होतील अशी भीती वाटते.


ट्रम्प यांनी गर्भपाताचे अधिकार संपवण्याचे समर्थन केले


2022 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचा अधिकार रद्द केला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी या निर्णयाचे समर्थन केले होते. आता महिलांना भीती वाटते की ट्रम्प सरकारच्या आगमनामुळे त्यांच्या गर्भपाताच्या अधिकारांवर परिणाम होऊ शकतो. मतदानोत्तर सर्वेक्षणात असे आढळून आले की 50 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांना सुरक्षित गर्भपात आणि संबंधित आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याची चिंता होती. अहवालानुसार, महिला अशा राज्यांमध्ये जाण्याचा विचार करत आहेत जिथे गर्भपाताशी संबंधित कायदे सोपे आहेत. या अंतर्गत त्यांना गर्भपाताशी संबंधित सेवा सहज मिळू शकतात. दरम्यान, अनेक कंपन्या टेलीमेडिसिन आणि ऑनलाइन सेवांद्वारे महिलांना घरपोच गर्भनिरोधक गोळ्या पुरवत आहेत.


अमेरिकेच्या इतिहासात गर्भपातावर अनेकदा बंदी घालण्यात आली 


अमेरिकेत 1880 पर्यंत गर्भपात कायदेशीर होता. 1873 मध्ये अमेरिकेत गर्भपाताच्या औषधांवर बंदी घालण्यात आली होती. 1900 पर्यंत जवळजवळ सर्व राज्यांमध्ये गर्भपातावर बंदी घालण्यात आली होती. जेव्हा गर्भधारणेमुळे आईच्या जीवाला धोका होता तेव्हाच गर्भपात करता आला. 1960 च्या दशकात महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळ सुरू केली. 1969 मध्ये नॉर्मा मॅककॉर्वे यांनी गर्भपात कायद्याला आव्हान दिले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेत गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली. पण 24 जून 2022 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला. यानंतर महिलांना गर्भपातासाठी दिलेले संविधानिक संरक्षणही संपुष्टात आले. त्यावेळी ट्रम्प यांनी या निर्णयाचे समर्थन केले होते.


डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत एकहाती सत्ता


अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने 50 राज्यांतील 538 जागांपैकी 312 जागा जिंकल्या. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना कडवी झुंज देऊनही केवळ 226 जागा जिंकता आल्या आहेत. अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा पराभव केला. ग्रोव्हर क्लीव्हलँड यांच्यानंतर पराभवानंतर सत्तेत परतणारे डोनाल्ड ट्रम्प हे दुसरे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या