Britain Cabinet News : ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak ) यांनी पंतप्रधानपदाचा (UK PM) पदभार स्वीकारला. यानंतर अवघ्या एका तासातच ते अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले. सुनक यांनी जुनं मंत्रिमडळ बरखास्त करत नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली. सुनक यांनी माजी पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्याना तात्काळ राजीनामा देण्याचा आदेश दिला. ऋषी सुनक यांनी मंगळवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स यांची भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी सुनक यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त करत त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं.
सुनक यांनी नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. लिझ ट्रस (Liz Truss) यांच्या मंत्रिमंडळातील चार नेत्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्यापार सचिव जेकब रीज-मॉग, न्याय खात्याचे सचिव ब्रॅन्डन लिवाइज आणि विकास मंत्री विकी फोर्ड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर ऋषी सुनक यांनी नवीन मंत्रीमंडळ स्थापन केलं आहे.
सुएला ब्रेव्हरमन पुन्हा गृहमंत्रीपदी
सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांची पुन्हा एकदा ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. माजी पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) यांच्या मंत्रिमंडळातही सुएला ब्रेव्हरमन गृहमंत्री होत्या. मात्र लिझ ट्रस यांनी त्यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिला होता. सुएला ब्रेव्हरमन यांनी सरकारी दस्तऐवज लीक केल्याचा आरोप झाला. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र सुएला ब्रेव्हरमन यांची पुन्हा एकदा ब्रिटनच्या गृहमंत्री पदी निवड झाली आहे. सुनक यांनी नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे.
पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केले की डॉमिनिक राब यांची उपपंतप्रधान आणि न्याय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी सुनक यांना पाठिंबा दिला. बोरिस जॉन्सन यांना पुन्हा पंतप्रधानपदी नको, असे ते म्हणाले होते. त्याचबरोबर भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन या ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून परतल्या आहेत. यापूर्वी त्यांनी याच पदावरून लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. या व्यतिरिक्त, क्वासी क्वार्टेंग यांची जागा घेणारे जेरेमी हंट हे अर्थमंत्री म्हणून कायम राहतील.
कोण आहेत ऋषी सुनक?
ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक भारतीय वंशाचे असून ते भारताचे जावई आहेत. ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय होते. भारत - पाकिस्तान फाळणीवेळी त्यांचं कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आलं. त्यानंतर ते ब्रिटनमध्ये गेले. ऋषी सुनक यांनी इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत लग्न केलं आहे.