Croatian Foreign Minister Video Viral : क्रोएशियाचे परराष्ट्र मंत्री (Croatian Foreign Minister) गॉर्डन ग्रलिक रेडमन यांच्या एका आक्षेपार्ह्य कृत्यामुळे सोशल मीडियातून (Social Media) त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. एका शासकीय कार्यक्रमात जर्मनच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेयरबॉक यांना जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जर्मनीची राजधानी बर्लिन येथे झालेल्या युरोपियन युनियनच्या परिषदेत एका ग्रुप फोटोदरम्यान अचानक बेयरबॉक गालाचं चुंबन घेऊन रेडमन यांनी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांना कमालीचं अस्वस्थ केलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून बरीच टीका होत आहे.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असं दिसून येतंय की, रेडमन जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना यांना हस्तांदोलन करण्यासाठी वळतात आणि त्यानंतर त्यांच्या गालाचं चुंबन घेतात. व्हिडीओमध्ये अॅनालेना त्यांना दूर सारत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच, रेडमन यांच्या कृत्यानंतर अॅनालेना प्रचंड अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. EU समिटच्या बैठकीनंतर सर्व नेते फोटोशूटसाठी जमले असताना ही घटना घडली.






रेडमन यांच्यावर नेटकऱ्यांकडून टीकेची झोड 


क्रोएशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या या कृत्यावर क्रोएशियाचे माजी पंतप्रधान जद्रानका कोसोर यांनी सोशल मीडियावर रेडमन यांच्यावर टीका केली आहे. कोसोरनं क्रोएशियन भाषेत लिहिलं आहे की, "महिलांचं बळजबरीनं चुंबन घेणं यालाही हिंसा म्हणतात, नाही का?" तसेच, इथपर्यंत मजल गेलीच कशी? असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीका पाहता रेडमननं या घटनेवर आपलं स्पष्टीकरणही दिलं आहे. ते म्हणाले की, "मला कळत नाही काय प्रॉब्लेम आहे... आम्ही नेहमी एकमेकांचं स्वागत करतो. मी जे केलं ते एका सहकाऱ्याप्रति असलेली आपुलकी व्यक्त करण्याची पद्धत होती."


क्रोएशियन महिला अधिकार कार्यकर्ता राडा बोरिक यांनीही परराष्ट्र मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, रेडमन यांचं कृत्य आक्षेपार्ह्य होतं. त्यांनी म्हटलंय की, तुम्ही केवळ त्याच व्यक्तीच्या गालाचं चुंबन घेऊ शकता, ज्याच्यासोबत तुमचं नातं तसं असेल, यासाठी तुम्ही कोणावर जबरदस्ती करु शकत नाही. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, हे तर स्पष्ट आहे की, रेडमन यांचं जर्मन परराष्ट्रमंत्र्यांसोबत काहीच नातं नव्हतं, मग त्यांनी असं कृत्य का केलं असावं? व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही लक्षात येईल की, अॅनालेनाही त्यांच्या कृत्यानं हैराण झाल्यात.


दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच स्पेनचा सॉकर चीफ लुईस रुबियालेस यानंही जेन्नी हर्मोसोच्या ओठांवर चुंबन घेतल्याप्रकरणी निशाण्यावर आला होता. लुईसनं महिला वर्ल्डकप सेरेमनी दरम्यान जेन्नीला किस केलं होतं, ज्यावर जेन्नीनं यावर आक्षेप व्यक्त केला होता. लुईस यांनी सुरुवातीला आपल्या कृत्याचा बचाव केला होता की, ते जेन्नीला आपली मुलगी मानतात, त्यामुळेच त्यांनी तिच्या ओठांचं चुंबन घेतलं होतं, परंतु टीका झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली. 27 ऑगस्ट रोजी फिफानंही त्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केलं होतं.