Kusal Mendis Reaction on Virat Kohli : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारताची (India) दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. भारताने (Team India) सलग आठ सामन्यांमध्ये विजय मिळवत विजयी वाटचालीसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू 'किंग' कोहली (Virat Kohli) नं वनडे कारकिर्दीतील (ODI Career) 49 वं शतकं झळकावलं. या दमदार शतकी खेळीसह विराट कोहली (Virat Kohli Record) ने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) च्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या कोहलीच्या या विराट विक्रमाचं जगभरातून कौतुक होत आहे. अशात कोहलीच्या शतकी खेळीवर प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडिस याची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
विराटच्या नावे आणखी एक विक्रम
विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीती 49 शतकं ठोकत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार कुशल मेंडिस याला पत्रकार परिषदेदरम्यान कोहलीच्या शतकाबाबत त्याला शुभेच्छा देण्याबाबत पत्रकाराने विचारलं असता, कुशलकडून भलतंच उत्तर मिळालं. या उत्तरानंतर उपस्थित सर्वच अवाक झाले होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रीलंकेचा कर्णधार नेमकं काय म्हणाला?
श्रीलंकेचा संघ बांगलादेशविरुद्ध विश्वचषकात 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या मैदानावर खेळणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी श्रीलंकेचा कर्णधार जेव्हा पत्रकार परिषदेत पोहोचला, तेव्हा त्याला विराट कोहलीच्या 49 व्या शतकाबद्दल आणि त्याच्या कामगिरीबद्दल काय सांगायचे आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. कोहलीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कुसल मेंडिस म्हणाला की, मी त्याचे अभिनंदन का करू? मेंडिसचे हे उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
विश्वचषकात श्रीलंकेची निराशाजनक कामगिरी
श्रीलंकेच्या संघाची विश्वचषकात आतापर्यंत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली असून, त्यात त्यांना सात सामने खेळून केवळ 2 विजय मिळवता आले आहेत. संघ अजूनही उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत असला तरी त्यांना टॉप-4 मध्ये स्थान मिळवणे फार कठीण आहे.
श्रीलंकेचं क्रिकेट बोर्ड बरखास्त
भारताविरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंकेचं संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आलं आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे (Sri Lanka sports Minister Roshan Ranasinghe) यांनी पराभवानंतर टोकाचं पाऊल उचललं आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्र्यांनी श्रीलंकन क्रिकेटचं बोर्ड बरखास्त (Sri Lanka Cricket Board) करण्याचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी पराभव, त्यातच विश्वचषकातून बाहेर पडल्याने, श्रीलंकंन प्रशासनाने हे पाऊल उचललं.