जिनिव्हा : जगभरातील शास्त्रज्ञ सध्या कोरोना विषाणू संसर्गावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञांनी दिली आहे. भारतातील जवळपास सात कंपन्या कोरोना लस विकसित करण्याच्या जवळपास पोहचल्या आहेत. मात्र, संपुर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन लस उपलब्ध होण्यासाठी सहा ते 9 महिन्याचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.


अनेक ठिकाणी कोविड-19 लस तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. यात भारत बायोटेक ही कंपनी 15 ऑगस्टपर्यंत लस विकसित करेल, असा दावा केला जात आहे. मात्र, लसीवरील मानवी चाचण्या आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन लस उपलब्ध होण्यासाठी किमान 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. soumya swaminathan) यांनी सांगितल्याचं वृत्त आहे.


Corona Vaccine | भारत बायोटेक पाठोपाठ झायडस कॅडिला कंपनीच्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीला परवानगी


जर सर्व सुरळीत झालं तर लसीच्या फेज 1 ते फेज 3 पर्यंत किमान सहा महिने लागतील, असं डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या. भारत बायोटेकला केवळ फेज 1 आणि फेज 2 ची चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. फेज 3 ट्रायल ज्याला मोठ्या प्रमाणात चाचण्या कराव्या लागतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वंयसेवकांचा सहभाग असतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. असं असताना 15 ऑगस्टच्या आधी लस विकसित करणे म्हणजे फेज 3 वगळणे किंवा घाईत करण्याचा प्रकार आहे.


फेज 3 वगळली तर काय होईल?
लस विकसित करणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कोणतीही लस विकसित करण्याची एक प्रक्रिया असते. यात 1 ते 3 फेज असात, यात फेज 3 सर्वात महत्वाची आहे. कारण, यात मानवी चाचणी करायची असते. यात मोठ्या प्रमाणात स्वंयवेकाचा सहभाग असतो. यात लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षा तपासली जाते. या लसीचे दुष्पपरिणाम होतात का? हे तपासले जातात. यासाठी खूप निरिक्षणं नोंदवली जातात. ही संपूर्ण प्रक्रिया खूप सावकाश राबवली जाते. त्यामुळे त्याबाबत अनिश्चिततादेखील आहे. मात्र, आपल्याकडे अनेक कंपन्या लस तयार करत आहे, ही एक चांगली बाब आहे. आपलं नशीब असेल तर या वर्षाच्या अखेरपर्यंत एक किंवा दोन कंपन्या तरी प्रभावी लस तयार करण्यात यशश्वी होतील, अशी मला आशा आहे", असं स्वामिनाथन यांनी सांगितले.


Web Exclusive | भारत बायोटेकच्या लसीसंदर्भात बेळगावच्या डॉ. अमित भाटे यांच्याशी संवाद