Covid In China : कोरोनानं संपूर्ण जगाची धास्ती वाढवली आहे. या जीवघेण्या व्हायरसचा सामना संपूर्ण जगभरातील देश गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. अशातच पुन्हा एकदा जगभरात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचं उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील सर्वात मोठं शहर शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर, शांघाय व्यतिरिक्त चीनमधील इतर देशांमध्येही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शांघायच्या स्थानिक सरकारनं सांगितलं की, सोमवार ते शुक्रवार शांघायच्या पुडोंग आणि आसपासच्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच पीपल्स कोविडची मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जात आहे.


शांघायच्या स्थानिक प्रशासनानं सांगितलं की, "हुआंगपु नदीच्या पश्चिमेकडील डाउनटाउन भागात शुक्रवारपासून लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच लोकांना घरातच राहण्याचे आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक पदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अत्यावश्यक कार्यालयं वगळता इतर सर्व कार्यालयं बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सरकारी आदेशात म्हटलं आहे.


शांघायमध्ये पुन्हा लॉकडाऊन 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टही बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. 26 मिलियन लोकसंख्या असणाऱ्या शांघायमध्ये आता अनेक सेक्टर्स बंद करण्यात आले आहेत. जागोजागी कोरोना चाचण्या करण्यासाठी तपासणी केंद्रही सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शांघायच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न 


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. सध्या चीनच्या उत्तरेकडील जिलिनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. तसेच बीजिंगमध्ये 'डायनामिक झिरो-कोविड' नीति अंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चिनी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आमचं संपूर्ण लक्ष लवकरात लवकर कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यावर आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांध्ये 10.6 टक्क्यांनी घट, गेल्या 24 तासांत 1270 नवे रुग्ण