Covid-19 Virus: जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सर्वात आधी हा विषाणू चीनच्या वुहान शहरात पसरला होता, यानंतर याने संपूर्ण जगाला जगाला वेढले. यामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या विषाणूमागे चीनचा हात असल्याचे मानले जात होते. आता एफबीआयच्या संचालकांनीही हे स्पष्ट केले आहे की, हा विषाणू चीनच्या वुहान प्रयोगशाळेमधून आला आहे. एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर वे यांनी म्हटले आहे की, यंत्रणेला विश्वास आहे की कोविड-19 चा उगम बहुधा चीनी सरकार नियंत्रित असलेल्या प्रयोगशाळेत झाला आहे.
ख्रिस्तोफर वे यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, "एफबीआयने असे मूल्यांकन केले आहे की कोरोना साथीच्या रोगाची उत्पत्ती प्रयोगशाळेतूनच झाली असण्याची अधिक शक्यता आहे.'' कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली याबाबत एफबीआयने केलेली ही पहिली सार्वजनिक पुष्टी आहे. मात्र चीन आधीचपासूनच या आरोपांना मानहानीकारक म्हणत असून वुहानच्या प्रयोगशाळेतून या विषाणूचा उगम झाल्याचं नाकारत आहे. आताही चीनने हा दावा फेटाळला आहे. मंगळवारी त्यांच्या मुलाखतीत ख्रिस्तोफर म्हणाले की, या विषाणूचा उगम कसा आणि कुठून झाला याशी संबंधित माहिती समोर येऊ नये म्हणून चीन आधीपासूनच यात अडथळे निर्माण करण्याचं काम करत आहे.
काही संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, हा विषाणू आधी चीनच्या वुहानमधील प्राण्यांमध्ये आणि नंतर मानवांमध्ये पसरला. असे मानले जाते की, वुहानच्या सीफूड आणि वन्यजीव बाजारात विकल्या जाणार्या प्राण्यांद्वारे ते मानवांमध्ये पसरले आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या जगातील आघाडीच्या व्हायरस प्रयोगशाळेपासून मार्केट 40 मिनिटांच्या अंतरावर आहे.
दरम्यान, डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा फैलाव झाला आणि त्यावेळेपासून अद्यापही जग या विषाणूचा सामना करीत आहे. हा विषाणू नेमका कुठून फैलावला पाबाबत उलटसुलट दावे करण्यात आले आणि त्याबाबत या आधी ठोस माहिती समोर आलेली नव्हती. चीनच्या बुहान प्रयोगशाळेतूनच (Wuhan Laboratory China) हा विषाणू लीक झाला व त्याचा फैलाव होत गेला असे म्हटले जाते. आता या दाव्याची अमेरिकेने पुष्टी केली आहे.