Coronavirus : जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. संपूर्ण जगाला या जीवघेण्या व्हायरसने वेठीला धरलं आहे. दरदिवशी जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच जगभरात पहिल्यांदाच एकाच दिवसांत 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांत जगभरात पहिल्यांदाच सर्वाधिक 4.12 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच याआधी एकदिवस अगोदर 3.97 लाख नवे कोरोना बाधित आढळून आले होते. या व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत 6185 लोकांचा मृत्यू झाला आहे.


वर्ल्डोमीटरनुसार, जगभरात आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 65 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 11 लाख 8 हजार 617 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2 कोटी 96 लाख 48 हजार रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जगभरात केवळ 88 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केस आहेत.


टॉप-10 कोरोना बाधित देशांची यादी


कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच या देशात झपाट्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. येथे आतापर्यंत 82 लाख 88 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेत मागील 24 तासांत 71 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेनंतर या यादीत भारताचा समावेश होतो. भारतात 74 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे गेल्या 24 तासांत 65 हजार रुग्ण आढळून आले आहेत. तसेच अमेरिका आणि भारतानंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव ब्राझीलमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. ब्राजीलमध्ये गेल्या 24 तासांत 30 हजार रुग्ण आढळून आले आहेत.


अमेरिका : एकूण रुग्ण 8,288,278, मृत्यू 223,644
भारत : एकूण रुग्ण 7,430,635, मृत्यू 113,032
ब्राजील : एकूण रुग्ण 5,201,570, मृत्यू 153,229
रशिया : एकूण रुग्ण 1,369,313, मृत्यू 23,723
स्पेन : एकूण रुग्ण 982,723, मृत्यू 33,775
अर्जेंटीना : एकूण रुग्ण 965,609, मृत्यू 25,723
कोलंबिया : एकूण रुग्ण 945,354, मृत्यू 28,616
पेरू : एकूण रुग्ण 862,417, मृत्यू 33,648
मेक्सिको : एकूण रुग्ण 834,910, मृत्यू 85,285
फ्रान्स : एकूण रुग्ण 834,770, मृत्यू 33,303


पाहा व्हिडीओ : सकाळच्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | सुपरफास्ट बातम्या



13 देशांमध्ये 5 लाखांहून अधिक कोरोना बाधित


जगभरातील 13 देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 5 लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये साऊथ आफ्रिका, यूके आणि इराण यांचाही समावेश आहे. जगभरातील 60 टक्के लोकांचा मृत्यू केवळ सहा देशांमध्ये झाला आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको, ब्रिटन, इटली या देशांचा समावेश होतो. तर जगभरातील केवळ चार देशांमध्ये 85 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या चार देशांमध्ये जवळपास 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या जगभरातील मृत्यूंच्या संख्येच्या एकूण 40 टक्के इतकी आहे.


भारत जगभरात सर्वाधिक कोरोना संसर्गाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एवढचं नाहीतर सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचसोबत भारत असा दुसरा देश आहे, जिथे सर्वात जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :