Coronavirus | अमेरिकेत कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 2 हजार 228 लोकांचा मृत्यू, कोरोना बाधितांची संख्या 6 लाख पार

जगभरात हैदोस घालणाऱ्या जीवघेण्या कोरोनाने अमेरिकेत आतापर्यंत तब्बल 26 हजार 47 लोकांचा बळी घेतला आहे.

Continues below advertisement

वॉशिंग्टन : जगभरातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसशी लढत आहे. अमेरिकेमध्ये मागील 24 तासांमध्ये 2 हजार 228 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या एका दिवसांत कोरनामुळे झालेल्या मृत्यूचा हा सर्वाधिक आकडा आहे. देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्याही सर्वाधिक आहे. जाणून घेऊया सध्याची परिस्थिती काय आहे?

Continues below advertisement

देशात आतापर्यंत 26 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू

वेबसाइट वर्ल्डओमीटरने दिलेल्या माहिनीतनुसार, अमेरिकेमध्ये कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 13 हजार 886 वर पोहोचली आहे. यापैकी 5 लाख 49 हजार 19 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 13 हजार 473 लोकांची प्रकृती गंभीर आहे. देशात आतापर्यंत 26 हजार 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेमध्ये आतापर्यंत 38 हजार 820 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :  भारतात कोरोनाचे किती रुग्ण? देशभरात कोरोनाने किती बळी घेतले?

संसर्ग झालेल्यांची सर्वाधिक संख्या न्यूयॉर्कमध्ये

अमेरिकेत 26 हजार 47 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यातील सर्वाधिक कोरोना बाधित न्यूयॉर्क शहरात आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 10 हजार 834 लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्याही सर्वाधिक असून आतापर्यंत 2 लाख 3 हजार 123 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

जगभरात जवळपास 20 लाख लोकांना कोरोनाची बाधा

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा जगभरातील आकडा वाढून जवळपास 20 लाखांवर पोहोचला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे संसर्ग झालेल्यांचा एकूण आकडा 19 लाख 98 हजार 111 आहे. तर 1 लाख 26 हजार 604 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये 1 लाख 74 हजार 60 कोरोना बाधितांची संख्या आहे. तर मृतांच्या आकड्यामध्ये अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 21 हजार 67 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 18 हजार 255 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola