मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 17 हजारांच्या वर पोहोचली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 17 हजार 799 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 76286 नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 31 लाख 36 हजार 232 वर पोहोचली आहे. जगभरात 9 लाख 53 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर मागील 24 तासात जगात 6351 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.  जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.


जगात  कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1035765 कोरोनाचा संसर्ग झालाय.  तर 59266 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं 23822 लोकांचा मृत्यू झालाय. 232128 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 26,977  मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 197,414  इतका आहे.

Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO

जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 50 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.



    • फ्रांस: कोरोनाबाधित- 165,911, मृत्यू - 23,660

    • यूके: कोरोनाबाधित- 161,145, मृत्यू - 21,678

    • जर्मनी: कोरोनाबाधित- 159,912, मृत्यू - 6,314

    • टर्की: कोरोनाबाधित- 114,653, मृत्यू - 2,992

    • रशिया: कोरोनाबाधित- 93,558, मृत्यू - 867

    • इरान: कोरोनाबाधित- 92,584, मृत्यू - 5,877

    • चीन: कोरोनाबाधित- 82,836, मृत्यू - 4,633

    • ब्राझिल: केस- 72,899, मृत्यू - 5,063

    • कॅनडा: कोरोनाबाधित- 50,026, मृत्यू - 2,859

    • भारत - कोरोनाबाधित- 31324, मृत्यू - 1008




संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने इशारा दिला आहे. आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियामधील काही देशांमध्ये कोरोनाचा वाढणारा आकडा चिंताजनक असल्याचं मत डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ आहे,  असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी युरोपीय देशांमध्ये शिथील करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत बोलताना सांगितलंय. ते म्हणाले की, 'या देशांमध्ये टेस्टिंग कपॅसिटी फार कमी आहे. ज्यामुळे मृतांचा आणि कोरोनाची बाधा झालेल्यांचा योग्य आकडा समजणं कठिण आहे. WHO ने इबोला व्हायरस दरम्यान, वॅक्सिन तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि असचं आम्ही कोविड-19च्या बाबतीत करणार आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले की, याआधीही आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी कोविड-19साठी औषध तयार केलं आहे.

संबंधित बातम्या : 

दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू

Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!

Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू