नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 84 हजारांवर गेली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 184202 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 26 लाख 37 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात सात लाख 18 हजार रुग्ण बरे झाले आहेत तर अजून जवळपास 17 सोळा लाख 35 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील तीन टक्के म्हणजे 56 हजार 650 बाधित गंभीर आहेत. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.


अमेरिकेने गेल्या 24 तासात 2341 लोक कोरोनामुळं गमावले आहेत. अमेरिकेत एकूण बळींची संख्या ही 48 हजार 659 वर जाऊन पोहोचली आहे. तर  रुग्णांची संख्या आठ लाख 48 हजारांवर गेला आहे.


न्यूयॉर्क प्रांतात काल ६६१ बळी, तिथे रुग्णांची संख्या २ लाख ६२ हजार २६८ तर एकूण मृतांचा आकडा २०,३५४ वर गेला आहे.


त्या खालोखाल न्यूजर्सीत ५,०६३, मिशिगन मध्ये २,८१३, मासाचुसेट्स २१८२, लुझियाना १४७३, इलिनॉईस १५६५, कॅलिफोर्निया १४१९, पेनसिल्वानिया १७१३, कनेक्टिकट १५४४ आणि वॉशिंग्टनमध्ये ६९२ लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.


 स्पेनने गेल्या चोवीस तासात ४३५ लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा २१ हजार ७१७ वर पोहोचला आहे.


काल इटलीत कोविड-१९ रोगाने ४३७ माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या २५ हजार ८५ इतकी झाली आहे. काल रुग्णांची संख्या ३ हजार ३७० ने वाढली,  इटलीत आता जवळपास १ लाख ८७ हजार रुग्ण आहेत.


 इंग्लंडने दिवसभरात ७६३ लोकांनी जीव गमावला, तिथला बळीचा आकडा पोहोचला १८,१०० वर पोहोचला आहे. फ्रान्सने काल दिवसभरात ५४४ लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत २१ हजार ३४० बळी गेले तर  एकूण रुग्ण १ लाख ६० हजारावर आहेत.


जर्मनीत काल २२९ बळी गेले, एकूण बळींची संख्या ५,३१५ वर पोहोचलीय.


इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल ९४ ची भर, एकूण ५,३९१ मृत्यू, रुग्णांची संख्या ८६ हजार इतकी आहे.


कोरोनाने बेल्जियममध्ये काल २६४ मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ६,२६२ इतका आहे.


हॉलंडमध्ये काल १३८ बळी घेतले तिथे एकूण ४,०५४ लोक दगावले आहेत.


टर्की २३७६,  ब्राझील २९०६, स्वित्झर्लंडने १,५०९, स्वीडनमध्ये १९३७, पोर्तुगाल ७८५, कॅनडात १९७४, इंडोनेशिया ६३५,इस्रायल १८९ तर सौदी अरेबियात ११४ बळी कोरोनामुळं गेले आहेत.


दक्षिण कोरियात  काल १ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २३८ वर गेला आहे. आपला शेजारी पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ०७६ वर पोहोचली आहे, तिथे कोरोनाने २१२ लोकांचा बळी घेतला आहे.


गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ७९,९५९ तर बळींच्या आकड्यात  ६,६०७ ची भर पडली आहे.



संबंधित बातम्या : 


दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू

Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!

Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू