नवी दिल्ली : आज जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day)... 22 एप्रिल रोजी हा दिवस संपूर्ण जगभरात पर्यावर संरक्षणासाठी साजरा केला जातो. जागतिक पृथ्वी दिवस पहिल्यांदा 1970 मध्ये साजरा करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी जागतिक वसुंधरा दिनाला 50 वर्ष पूर्ण होत असून त्यासाठी 'क्लायमेट अॅक्शन' ही थीम ठेवण्यात आली आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी 'जागतिक पृथ्वी दिवस' किंवा 'World Earth Day' साजरा केला जातो. या आंदोलनाला 1969मध्ये जागतिक पृथ्वी दिवस (World Earth Day) हे नाव जुलियन कोनिग यांच्यामुळे मिळालं. त्याचबरोबर याचवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी 22 एप्रिल ही तारिख निवडण्यात आली.


आज जागतिक पृथ्वी दिवसाला 50 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने Google ने आपलं खास डुडल पृथ्वीवरील सर्वात लहान आणि महत्त्वाच्या मधमाशीला समर्पित केलं आहे. डुडलमध्ये 'प्ले' ऑप्शन बटनसोबत एक मधमाशीदेखील आहे. या प्ले बटणावर जेव्हा युजर क्लिक करेल, त्यावेळी एक छोटासा व्हिडीओ प्ले होत असून त्यातून मधमाशांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. कारण मधमाशा परागणच्या कृतीतून जगभरातील पिकांमध्ये आपलं दोन तृतियांश योगदान देतात.



याव्यतिरिक्त एक छोटासा गेमही आहे. ज्यामध्ये युजर्स मधमाशी आणि अवकाशातील ग्रहांबाबत मजेशीर गोष्टी शिकू शकतात. मधमाश्या फुलांवर बसतात आणि जीवन पुढे वाढवण्याचं काम करतात. जगभरातील लोकांना मधमाश्यांच्या योगदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी गुगलने हे खास डुडल तयार केलं आहे.


दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'कोरोना वॉरियर्स' म्हणजेच कोरोनाला हरवण्यासाठी लढा देणाऱ्यांना थँक्यू म्हणण्यासाठीही गुगलने आपल्या डुडल्सची मालिका तयार केली होती. या मालिकेच्या माध्यमातून कोरोना विरूद्ध लढा देणाऱ्या आणि लोकांच्या मदतीसाठी तप्तर असणाऱ्या लोकांचा सन्मान करण्यात आला होता. गुगलने शिक्षक, फूड सर्विस देणारे कर्मचारी, लोकांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवणारे पॅकेजिंग, शिपिंग आणि डिलीवरी वर्कर्सना धन्यवाद दिलं होतं.


संबंधित बातम्या : 


Google Doodle | गुगलचं 'कोरोना वॉरियर्स'साठी खास डुडल


Coronavirus | अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर


Apple ने लॉन्च केला स्वस्त iPhone SE, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Fact Check | कोरोना संकटामुळे तुमच्या प्रत्येक WhatsApp मेसेजवर सरकारची नजर?

5G मुळे कोरोना होतो? काय आहे या अफवेमागील सत्य