- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,321,666, मृत्यू- 78,599
- स्पेन: कोरोनाबाधित- 260,117, मृत्यू- 26,299
- इटली: कोरोनाबाधित- 217,185, मृत्यू- 30,201
- यूके: कोरोनाबाधित- 211,364, मृत्यू- 31,241
- रशिया: कोरोनाबाधित- 187,859, मृत्यू- 1,723
- फ्रांस: कोरोनाबाधित- 176,079, मृत्यू- 26,230
- जर्मनी: कोरोनाबाधित- 170,588, मृत्यू- 7,510
- ब्राझिल: कोरोनाबाधित- 145,892, मृत्यू- 9,992
- टर्की: कोरोनाबाधित- 135,569, मृत्यू- 3,689
- इरान: कोरोनाबाधित- 104,691, मृत्यू- 6,541
- चीन: कोरोनाबाधित- 82,886, मृत्यू- 4,633
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 40 लाख पार, पावनेतीन लाखांहून अधिक मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 09 May 2020 11:19 AM (IST)
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 40 लाखांच्या वर गेला आहे.
मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. मागील 24 तासात 96,927 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर 24 तासात 5,533 लोकांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 75 हजार 959 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 40 लाख 10 हजार 571 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 13 लाख 82 हजार 333 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 29 लाख कोरोना रुग्ण आहेत. Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,321,666 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 78,599 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं 26,299 लोकांचा मृत्यू झालाय. 260,117 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,201 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 217,185 इतका आहे. कोरोना संसर्ग सर्वाधिक असलेले दहा देश