वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 236,184 रुग्ण आहेत. तर 6,649 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 116,302 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 113,233 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 19,65,708 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 111,390 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 40,261 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 283,311इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 646,006 कोरोनाबाधित आहेत तर 35,047 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,134 लोकांचा मृत्यू झालाय. 283,311 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,774 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 234,531 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 19,65,708 मृत्यू- 111,390
- ब्राझील: कोरोनाबाधित- 646,006 , मृत्यू- 35,047
- रशिया: कोरोनाबाधित- 449,834 , मृत्यू- 5,528
- स्पेन: कोरोनाबाधित- 288,058 , मृत्यू- 27,134
- यूके: कोरोनाबाधित- 283,311, मृत्यू- 40,261
- भारत: कोरोनाबाधित- 236,184 , मृत्यू- 6,649
- इटली: कोरोनाबाधित- 234,531 , मृत्यू- 33,774
- पेरू: कोरोनाबाधित- 187,400 , मृत्यू- 5,162
- जर्मनी: कोरोनाबाधित- 185,414, मृत्यू- 8,763
- टर्की: कोरोनाबाधित- 168,340 , मृत्यू- 4,648
7 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत हे सात देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. इटली, ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.