मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 50 लाख रुग्ण झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा  4,985,825 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या सव्वातीन लाखांजवळ गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 324,889 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 1,958,441 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.


वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 106,475 रुग्ण, तर 3,302 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 60,864 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 42,309 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO


जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,570,583 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 93,533 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 35,341 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 248,818 इतकी आहे.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,778 लोकांचा मृत्यू झालाय. 278,803 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,169 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 226,699 इतका आहे.


या दहा देशात कोरोनाचा सर्वाधिक कहर






    • अमेरिका:          कोरोनाबाधित- 1,570,583               मृत्यू- 93,533

    • स्पेन:                  कोरोनाबाधित- 278,803               मृत्यू- 27,778

    • रशिया:               कोरोनाबाधित- 299,941              मृत्यू- 2,837

    • यूके:                  कोरोनाबाधित- 248,818             मृत्यू- 35,341

    • इटली:                कोरोनाबाधित- 226,699              मृत्यू- 32,169

    • ब्राझील:              कोरोनाबाधित- 271,885             मृत्यू- 17,983

    • फ्रांस:                कोरोनाबाधित- 180,809             मृत्यू- 28,022

    • जर्मनी:              कोरोनाबाधित- 177,827             मृत्यू- 8,193

    • टर्की:                  कोरोनाबाधित- 151,615                मृत्यू- 4,199

    • इरान:                कोरोनाबाधित- 124,603                 मृत्यू- 7,119




10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित


जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 93 हजारांवर गेला आहे.