वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर आहे. भारतात आत्ता कोविडचे 78,055 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2551 बळी गेले आहेत.
Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,430,348 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 85,197 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 33,186 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 229,705 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,104 लोकांचा मृत्यू झालाय. 271,095 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 31,106 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 222,104 इतका आहे.
- अमेरिका: कोरोनाबाधित - 1,430,348, मृत्यू- 85,197
- स्पेन: कोरोनाबाधित - 271,095, मृत्यू- 27,104
- रशिया: कोरोनाबाधित - 242,271, मृत्यू- 2,212
- यूके: कोरोनाबाधित - 229,705, मृत्यू- 33,186
- इटली: कोरोनाबाधित - 222,104, मृत्यू- 31,106
- ब्राझिल: कोरोनाबाधित - 189,157, मृत्यू- 13,158
- फ्रांस: कोरोनाबाधित - 178,060, मृत्यू- 27,074
- जर्मनी: कोरोनाबाधित - 174,098, मृत्यू- 7,861
- टर्की: कोरोनाबाधित - 143,114, मृत्यू- 3,952
- इरान: कोरोनाबाधित - 112,725, मृत्यू- 6,783
- चीन: कोरोनाबाधित - 82,926, मृत्यू- 4,633
10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 85 हजारांवर गेला आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर भारतात आत्ता कोविडचे 67 हजार 161 रुग्ण तर 2212 बळी कोरोनामुळं गेले आहेत.