मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 44 हजारांवर पोहोचली आहे.  कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 34 लाख 80 हजार 492 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 11 लाख 8 हजार रुग्ण बरे झाले आहेत.  मागील 24 तासात 82,398 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 5,162 जणांचा मृत्यू झाला आहे.


जगात  कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,160,774 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय.  तर 67,444 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोविड-19मुळं  25,100 लोकांचा मृत्यू झालाय. 245,567 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 28,710 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 209,328 इतका आहे.

Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO

जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथं कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.

विविध देशांमध्ये कोरोनाबाधित 

  • यूके: कोरोनाबाधित- 182,260, मृत्यू- 28,131

  • फ्रांस: कोरोनाबाधित- 168,396, मृत्यू- 24,760

  • जर्मनी: कोरोनाबाधित- 164,967, मृत्यू- 6,812

  • टर्की: कोरोनाबाधित- 124,375, मृत्यू- 3,336

  • रशिया: कोरोनाबाधित- 124,054, मृत्यू- 1,222

  • ब्राझिल: कोरोनाबाधित- 96,559, मृत्यू- 6,750

  • इरान: कोरोनाबाधित- 96,448, मृत्यू- 6,156

  • चीन: कोरोनाबाधित- 82,875, मृत्यू- 4,633

  • कॅनडा: कोरोनाबाधित- 56,714, मृत्यू- 3,566

  • बेल्जियम: कोरोनाबाधित - 49,517, मृत्यू- 7,765

  • भारत : कोरोनाबाधित -39,699, मृत्यू - 1,323