Coronavirus : जगभरात 212 देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 39 हजार पार पोहोचली आहे. मागील 24 तासांत 94,552 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,624 वाढला आहे. वर्ल्डोमीटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत 33 लाख 98 हजार 473 लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. यांपैकी 1,080,101 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


जगभरात कोणत्या देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव?


जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या एकूण आकड्यापैकी जवळपास एक तृतियांश रूग्ण अमेरिकेमध्ये आढळून आले आहेत. तर जवळपास एक चतुर्थांश मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेनंतर स्पेन कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेला दुसरा देश आहे. जिथे 24,824 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण 242988 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 28236 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 207,428 वर पोहोचली आहे. यानंतर फ्रान्स, जर्मनी, युके, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देशा जास्त प्रभावित झाले आहेत.


पाहा व्हिडीओ : चार मे पासून ग्रीन, ऑरेंज झोन आणि ग्रामीण भागात दारुची दुकानं सुरू



  • अमेरिका : एकूण 177,454 कोरोना बाधित, तर 27,510 जणांचा मृत्यू

  • फ्रान्स : एकूण 167,346 कोरोना बाधित, तर 24,594 जणांचा मृत्यू

  • जर्मनी : एकूण 164,077 कोरोना बाधित, तर 6,736 जणांचा मृत्यू

  • टर्की : एकूण 122,392 कोरोना बाधित, तर 3,258 जणांचा मृत्यू

  • रूस : एकूण 114,431 कोरोना बाधित, तर 1,169 जणांचा मृत्यू

  • इराण : एकूण 95,646 कोरोना बाधित, तर 6,091 जणांचा मृत्यू

  • ब्राझील : एकूण 92,109 कोरोना बाधित, तर 6,410 जणांचा मृत्यू

  • चीन : एकूण 82,874 कोरोना बाधित, तर 4,633 जणांचा मृत्यू

  • कॅनडा : एकूण 55,061 कोरोना बाधित, तर 3,391 जणांचा मृत्यू

  • बेल्जियम : एकूण 49,032 कोरोना बाधित, तर 7,703 जणांचा मृत्यू


रूस, टर्की, यूके, जर्मनी यांच्यासह आठ असे देश आहेत. जिथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या एक लाख पार पोहोचली आहे. पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन) असे आहेत, जिथे 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 61 हजार पार पोहोचला आहे.


संबंधित बातम्या :


Coronavirus | 45 मिनिटांत कोरोनाच्या टेस्टचा रिझल्ट समजणार; संशोधकांचा महत्त्वपूर्ण शोध


व्हाईट हाऊसकडून अवघ्या 19 दिवसात पंतप्रधान मोदी ट्विटरवर अनफॉलो!