Coronavirus | कोरोना बाधितांची संख्या संपूर्ण जगभरात वेगाने वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या आता 84 लाखांवर पोहोचली आहे. तर साडे चार लाख लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 83 लाख 92 हजार 582 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 50 हजार 452 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 44 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोना बाधित फक्त 8 देशांमध्ये आहेत.


जगभरात कोणत्या देशात काय परिस्थिती?


कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये दिसून येतो. अमेरिकेमध्ये 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तसेच दरदिवशी सर्वाधिक मृतांची नोंदही ब्राझीलमध्ये करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.


पाहा व्हिडीओ : देशात परत लॉकडाऊन लावणार ही अफवा : नरेंद्र मोदी



अमेरिका : एकूण रुग्ण 2,233,957, एकूण मृत्यू 119,941
ब्राझील : एकूण रुग्ण 960,309, एकूण मृत्यू 46,665
रशिया : एकूण रुग्ण 553,301, एकूण मृत्यू 7,478
भारत : एकूण रुग्ण 367,264, एकूण मृत्यू 12,262
यूके : एकूण रुग्ण 299,251, एकूण मृत्यू 42,153
स्पेन : एकूण रुग्ण 291,763, एकूण मृत्यू 27,136
पेरू : एकूण रुग्ण 240,908, एकूण मृत्यू 7,257
इटली : एकूण रुग्ण 237,828, एकूण मृत्यू 34,448
इराण : एकूण रुग्ण 195,051, एकूण मृत्यू 9,185
जर्मनी : एकूण रुग्ण 190,179, एकूण मृत्यू 8,927


8 देशांमध्ये दोन लाखांहून अधिक मृत्यू


ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथ एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. चार देश (अमेरिका, ब्राजील, ब्रिटेन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.20 लाखांवर पोहोचला आहे. चीन टॉप-18 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-4 कोरोना बाधित देशांमध्ये झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोरोनावर औषध मिळालं! 'डेक्सामेथासोन'नं रुग्ण बरे होत असल्याचा दावा


कोरोनावर औषध सापडलं! रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के, योगगुरु रामदेवबाबांचा दावा


चीनच्या उलट्या बोंबा! प्रवक्ते म्हणतात, भारतानं आपलं सैन्य ताब्यात ठेवावं