Coronavirus | जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 48 लाखांच्या पार पोहोचली आहे. कोरोनामुळे संसर्ग झालेल्या सर्वाधिक रुग्णांची संख्या अमेरिकेमध्ये आहे. येथे 15 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. परंतु, चिंताजनक गोष्ट म्हणजे, कोरोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये रूस दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जगभरात 320,121 लोकांचा मृत्यू झाला असून 19 लाख 07 हजार 992 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना बाधित रूसमध्ये


संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. अख्खं जग कोरोनापुढे हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 48 लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 लाख 20 हजारांवर पोहोचली आहे.


वर्ल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कालपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत खालच्या क्रमांकावर असलेला रूस आज दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. तर अमेरिकेमधील कोरोना बाधितांची संख्या 15 लाखांच्या पार पोहोचली आहे. तसेच रूसमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 2 लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. दरम्यान, मृतांच्या आकडेवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून त्यानंतर ब्रिटन, इटली आणि फ्रान्सचा क्रमांक आहे.


पाहा व्हिडीओ : अमेरिकेतील मॉर्डना औषध कंपनीचा कोरोनावर लस शोधल्याचा दावा



सर्वाधित कोरोना बाधितांचे मृत्यू अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये


कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण अमेरिकेमध्ये असून सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीतही अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरमुळे आतापर्यंत जवळपास 91 हजार 981 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्रिटनमध्ये 34 हजार 796, इटलीमध्ये 32 हजार आणि फ्रान्समध्ये 28 हजार 239 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये मृतांचा आकडा 27 हजार 709 वर पोहोचला आहे. तर रूसमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढली असली तरिही स्थिती इतर देशांच्या तुलनेत ठिक आहे. रूसमध्ये आतापर्यंत 2 हजार 722 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा एक लाख पार पोहोचला असून आतापर्यंत 3163 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या : 


Corona Vaccine | आम्ही कोरोनावर प्रभावी औषध शोधलंय; बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा


जगभरात कोरोना लसीचा शोध; 'या' पाच देशांचे दावे काय?


कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प