नवी दिल्ली : जीवघेणा कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हैदोस घातला आहे. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ताज्या आकड्यांनुसार, जगभरात 20 लाख 951 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 26 हजार 782 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाख 84 हजार 979 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरात दहा हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील मृतांचा आकडा अमेरिकेत अधिक

जगभरातील सर्वाधिक कोरोना बाधित अमेरिकेत असून 6 लाख 14 हजार 246 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 26 हजार 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक कोरोना बाधित न्यूयॉर्क शहरात आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 10 हजार 834 लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्याही सर्वाधिक असून आतापर्यंत 2 लाख 3 हजार 123 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

न्यूयॉर्क सिटी काऊंसिल कमिटीचे प्रमुख मार्क लेविन यांनी सांगितले की, 'मागील आठवड्यापर्यंत शहरात एकूण 20 ते 25 लोकांचा घरी मृत्यू होत होता. आता दररोज शहरातील घरांमध्ये मृतांचा आकडा 200 ते 215 लोकांचा मृत्यू झाला आहे.'

स्पेन दुसऱ्या आणि इटली तिसऱ्या क्रमांकावर

अमेरिकेनंतर स्पेनमध्ये 1 लाख 74 हजार 60 कोरोना बाधितांची संख्या आहे. तर मृतांच्या आकड्यामध्ये अमेरिकेनंतर इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 21 हजार 67 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 18 हजार 255 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | अमेरिकेत कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 2 हजार 228 लोकांचा मृत्यू, कोरोना बाधितांची संख्या 6 लाख पार

Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

Coronavirus | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा; आयसीयूमधून बाहेर

Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू