इस्लामाबाद : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हैदोस घातला आहे. चीनमध्ये डिसेंबरमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. आता कोरोना संपूर्ण जगभरात पसरला असून आतापर्यंत 135 देशांमध्ये दिड लाखांपेक्षा अधिक लोकांना या रोगाची लागण झाली आहे. तर 6000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानबाबत बोलायचे झाले तर 183 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यांपैकी सिंध प्रांतातील 150, इस्लामाबादमध्ये 2 आणि खैबर पख्तूनख्वामध्ये 15, पंजाबमध्ये एक, बलूचिस्तानमध्ये 10 आणि गिलगित-बाल्टिस्तानमध्ये पाच कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.


पाकिस्तानमधील मीडिया रिपोर्टनुसार, मागील 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून एकूण 131 कोरोनाचे रूग्ण समोर आले आहेत. पाकिस्तानमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकोपामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.


पाहा व्हिडीओ : #Coronavirus | मंत्रालयातील अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी कोरोना पॉझिटिव्ह, अधिकाऱ्याची चाचणी



उच्चस्तरीय बैठकीनंतर पाकिस्तानचे आरोग्य राज्यमंत्री जफर मिर्झा यांनी सांगितले की, सरकार कोरोना व्हायरसच्या वाढणाऱ्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच योग्य  पावलं उचलण्यात येत आहेत.


कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाकिस्तानला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. द नेशन ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (पीआईएमएस) मध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारं साहित्यही उपलब्ध नाही. त्यामुळे पाकिस्तानातील डॉक्टर्सही सुरक्षित नाहीत. रविवारी कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णाला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. परंतु त्यानंतर जे डॉक्टर्स रूग्णाच्या संपर्कात आले होते, त्यांनाही कोरेंन्टाईन करावं लागलं.


मीडीया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, 'पाकिस्तानमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. कारण हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या जवळपास 800 मेडिकल स्टाफसाठी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, हॉस्पिटलमधील काही वॉर्ड्समध्ये डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफला हात धुण्यासाठी सॅनिटायझरही पुरेसं उपलब्ध नाही.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू; जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती?


Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रियांका-दीपिकाकडे WHOचे डायरेक्टर डॉक्टर टेड्रोस यांचं अपील