नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरससमोर हतबल झालं आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाच्या या संकटाशी लढा देत आहेत. चीनमधून हा व्हायरस पाहता पाहता संपूर्ण जगभरात पोहोचला. इटलीमध्ये या जीवघेण्या आजाराने एका दिवसात तब्बल 743 बळी घेतले आहेत. त्यामुळे या आजाराने मरणाऱ्यांची संख्या 6820वर पोहोचली आहे. तसेच जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 19,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या तणावपूर्ण वातावरणात एक आशेचा किरण जागवणारी एक बातमी आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यूनिवर्सिटीचे सहाय्यक प्रोफेसर जॉएस करम यांनी एक ट्वीट केलं आहे आणि यामध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरसमुळए सतत खराब होणाऱ्या परिस्थितीमुळे काही चांगल्या गोष्टीही आहेत.
जॉएस करमने एका ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, वुहानमध्ये मागील 5 दिवसांमध्ये एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. तसेच रविवार आणि सोमवारी इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. तर जर्मनीतील चान्सलर एंजेला मर्केल यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. जगबरात रिकव्हर होणाऱ्यांची संख्या एक लाखांच्या जवळपास गेली आहे.
याव्यतिरिक्त जॉएस करम यांनी लिहिलं आहे की, 150 देशांमध्ये एकही नवा मृत्यू झालेला नाही. तसेच देशामध्ये कर्फ्यू आणि टेस्टिंगची स्थिती सुधारत आहे.
पाहा व्हिडीओ : दिलासादायक! 60 दिवसानंतर हुबेईतील लॉकडाऊन हटणार
भारतात 562 कोरोनाग्रस्त तर 11 जणांचा मृत्यू
भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून 562 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 11 लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. आज तमिळनाडूतील मदुरईमद्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काल मुंबईमध्ये एका व्यक्तीचा तर दिल्लीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एकूण 536 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 476 भारतीय नागरिक आहेत, तर 43 विदेशी नागरिक आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे, आतापर्यंत 40 जणांना कोरोनामुक्त करण्यास यश आलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 14 एप्रिलपर्यंत लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus Impact | भारतात लॉकडाऊन, जगभरात कोरोनामुळे काय बदललं?
India Lockdown : आज रात्री 12 पासून संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी
पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख