अॅमस्टरडॅम: डचच्या एका संशोधकाने कोरोनाच्या चाचणीसाठी आता अतिजलद आणि सोपी पद्धत शोधून काढली आहे. पीटर वॅन वीज या संशोधकाने एका अशा एअरलॉक केबिनचा शोध लावलाय की ज्यामध्ये जाऊन केवळ ओरडायचं किंवा गाणं म्हणायचं. या एयरलॉक केबिनच्या माध्यमातून तुम्हाला कोरोना झाला आहे का नाही याचं निदान होणार आहे.


कोरोना व्हायरसची स्वॅब टेस्ट वा नोजल टेस्ट ही काहीजणांना आवडत नाही, त्याचा त्रास होतो. अशा व्यक्तींसाठी ही एअरलॉक केबिनची टेस्ट खूप चांगली असल्याचा दावा याच्या संशोधकाने केलाय. या एअरलॉक केबिनच्या माध्यमातून कोरोनाची टेस्ट अतिजलद आणि सोपी होते असेही ते म्हणाले.





Corona Vaccine | रिलायन्सच्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार कोरोनाची मोफत लस, नीता अंबानी यांची घोषणा


जर तुम्ही खरोखरच कोरोना पॉझिटिव्ह असाल तर या एयरलॉक केबिनमध्ये तुम्ही ओरडाल किंवा गाणे म्हणाल तर तुम्ही कोरोनाचे हजारो पार्टिकल्स बाहेर टाकाल. त्यावेळी ते पार्टिकल्स डिटेक्ट करुन तुम्हाला कोरोना आहे का नाही याची माहिती दिली जाते. याची खात्री करण्यासाठी पीटर वॅन वीज याने अॅमस्टरडॅम येथील कोरोना सेंटरच्या बाहेर आपली ही एअरलॉक केबिन सुरु केली आहे. त्याचे हे एअरलॉक केबिन शाळा, एयरपोर्ट, कन्सर्ट, कार्यालय या ठिकाणी उपयुक्त असल्याचा दावा संशोधकाने केला आहे.


या एअरलॉक केबिनमध्ये कोरोना व्हायरसचे पार्टिकल्सचे नॅनोमीटर स्केल सायझिंग डिव्हाईसच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते आणि केवळ तीन मिनीटात आपल्याला कोरोना आहे का नाही याचा रिझल्ट येतो. पीटर वॅन वीज याच्या मते, आपल्या श्वासातून आणि कपड्यावरील अनेक मायक्रो पार्टिकल्सच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचे डिटेक्ट करता येते. पीटर वॅन वीज हा नेदरलॅन्डमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करतो.


Corona Vaccine Centre | लसीकरण केंद्रेचं सुपर स्प्रेडर होत नाहीत ना?