पुणे : पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. दोन्ही रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. लोकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, असं आवाहनही विभागीय आयुक्तांनी केलं आहे.


कोरोना बाधित दोन्ही रुग्ण फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात 40 जणांच्या ग्रुपसोबत दुबईला गेले होते. त्यानंतर पुण्यात आल्यावर गेल्या 15 दिवसात ते कुठल्या भागात गेले, याची माहिती घेतली जात आहे. या दोघांच्या कुटुंबातील तीन सदस्यांची चाचणी करण्यात आली आहे, त्याचे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येतील. दोन्ही व्यक्तींसोबत दुबईमध्ये गेलेल्या एकूण 40 व्यक्तींची नावं आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार सर्वजण विविध जिल्ह्यातील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे.अशी माहिती दीपक म्हैसकर यांनी दिली.


Coronvirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात


याशिवाय दोन्ही रुग्ण ज्या टॅक्सीतून मुंबईहून पुण्याला आले, त्या टॅक्सीच्या ड्रायव्हरलाही रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आलं आहे, त्याचीही चाचणी करण्यात आली आहे. दुबई हे ठिकाण केंद्र सरकारने त्यावेळी प्रवासासाठी प्रतिबंधित केलेल्या देशांच्या यादीत नव्हतं. त्यामुळे या दोघांची त्यावेळी चाचणी करण्यात आली नाही, असं दीपक म्हैसकर यांनी सांगितलं.


कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटवण्यासाठी पुण्यात पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. या पाच टीममध्ये आरोग्य, पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी 207 बेड तयार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती दीपक म्हैसकर यांनी दिली.


संबंधित बातम्या :


Coronavirus |देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, संख्या 43 वर


माझा विशेष | कोरोनाची भीती...कोंबडी उद्योगाची माती...