वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. तर डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजय झाले आहेत. अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून जो बायडन शपथ घेणार आहेत. परंतु, अमेरिका निवडणुकीत झालेला आपला पराभव मान्य करायला डोनाल्ड ट्रम्प काही तयार नाहीत.


अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. परंतु, आता निकाल जाहीर झाल्यानंतरही ते आपला पराभव मान्य करायला तयार नाहीत. तसेच ते सतत जो बायडन यांच्याविरोधात अनेक वक्तव्य करत आहेत. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जॅरेड कूश्नर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी आपले सासरे डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला देत, आपला पराभव स्विकारण्यास सांगितले आहे.


ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी गेले होते कूश्नर


मीडिया रिपोर्टनुसार, जोरेड कूश्नर आपले सासरे डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणाले की, 'त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत डेमोक्रेटिक उमेदवार जो बायडन यांच्याकडून झालेला पराभव आता मान्य करावा.' सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसं जो बायडन हे निवडणूक जिंकून अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.


डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 'मी तोपर्यंत आराम करणार नाही, जोपर्यंत अमेरिकी लोकांकडील ईमानदार मतांची मोजणी होत नाही आणि ही लोकतंत्राची मागणी आहे.' डोनाल्ड ट्रम्प यांच्या याच वक्तव्यानंतर त्यांचे जावई कूश्नर यांनी आपल्या सासरेबुवांना सल्ला दिला होता.


अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा


अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिका राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. असे असताना ही निवडणूक जिंकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत आपण जिंकल्याचा दावा केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये ट्रम्प म्हणाले, "I WON THIS ELECTION, BY A LOT!". या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


पाहा व्हिडीओ : जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष



या राज्यांमध्ये जिंकले ट्रम्प


डोनाल्ड ट्रम्प यांनी इदाहो, लोवा, फ्लोरिडा, साउथ डकोटा, मिसौरी, लुइसियाना, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, अरकांसस, अलबामा, मिसिसिपी, मोनटाना, ओहियो, ओक्लाहोमा, टेनेसी, केंटकी, वेस्ट वर्जीनिया, व्योमिंग, टेक्सास, साउथ कॅरोलिना, इंडियाना, उताह आणि वियोमिंग मध्ये विजय मिळवला आहे.


विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज असते. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत. ट्रम्प यांच्या टीमनं टीम मिशिगन, पेंसिलवेनिया, जॉर्जिया आणि नवादामध्ये केसेस दाखल केल्या आहेत. तर विस्कॉन्सिनमध्ये मतगणना पुन्हा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे. दुसरीकडे जो बायडन यांनी देखील आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी आवाहन केलं आहे.


बायडन यांनी या राज्यांमध्ये विजय मिळवला


बायडन यांनी वेस्ट वर्जीनिया, वॉशिंगटन कॅलिफोर्निया, कोलोराडो, न्यू हॅम्पशायर, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, न्यूयॉर्क, न्यू मॅक्सिको, वर्मोंट, कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मैरीलँड, मैसाचुसेट्स, न्यू जर्सी, टेनेसी ओरेगन, विस्कॉन्सिन, रोड आयलँड, वरमोंट, हवाई, मिशिगन, मिनेसोटा आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :