China Corona Update : चीनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. शांघायमध्ये सर्वात भयावह परिस्थिती आहे. शांघायमध्ये लॉकडाऊन (Lockdown) आणि कडक निबंधांनतरही कोरोना संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाहीय. शुक्रवारी शांघायमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले. मिळालेल्या अहवालानुसार, शुक्रवारी दिवसभरात 24 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये 20 हजार 700 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती, परंतु अहवाल पॉझिटिव्ह आला.
लॉकडाऊनचा काही फायदा नाही
चीन सरकारने 15 दिवसांपूर्वी शांघायमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यामुळे कडक लॉकडाऊन लागू केला. मात्र त्यानंतरही शांघायमधील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. इथे दररोज सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं आढळून येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येथे दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शांघायसह चीनमधील इतर शहरांमध्ये कोरोना चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे. रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त खाटा आणि अतिरिक्त रुग्णालये बांधण्यात येत आहेत.
अन्नधान्याची टंचाई
कोरोनामुळे शांघाय अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहे. यामुळे जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. शांघायमध्ये अनेकांच्या घरात अन्न नाही. चीनच्या अधिकृत ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शांघायमध्ये कोरोनामुळे सर्वात वाईट परिस्थिती आहे. लोकांना अन्नधान्याचीही समस्या भेडसावत आहे. जनता सरकारविरोधात सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त करत आहे. शांघायमध्ये उपचाराच्या प्रतीक्षेत असलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर लोकांमध्ये अधिक संतापाचं चित्र पाहायला मिळत आहे.
चीन मृत्यूची आकडेवारी लपवत आहे?
रिपोर्टनुसार, चीन पुन्हा कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी लपवत आहे. शुक्रवारी शांघायमधील रुग्णालयात सुमारे 12 वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगण्यात आलं. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार 2020 पासून शहरात या आजारामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 975 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
- Russia Ukraine War : कीव्हमध्ये 900 हून अधिक मृतदेहांचा खच, रशियन सैन्य माघारी परतल्यानंतरच वास्तव
- Viral Video : ससा आणि सापाची झुंज पाहिलीय का? तुफान लढतीचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha