Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत 975 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. काल 949 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 6 जणांचा मृत्यू झाला. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या 5 लाख 21 हजार 747 वर पोहोचली आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 366 इतकी झाली आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 366 इतकी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 366 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 747 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 7 हजार 831 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका झाला आहे.
आतापर्यंत 186 कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 6 लाख 89 हजार 724 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 38 लाख 31 हजार 723 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मुंबईतील एक्स्प्रेस अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा, या एक्सप्रेस रद्द
- Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC ट्रेनसंदर्भात मोठं अपडेट, जाणून घ्या काय असेल खास...
- MoD Recruitment 2022 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी, 'या' पदांवर भरती, 50 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना करता येणार अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha