Colombia Bullfight : मध्य कोलंबियामध्ये कोरालेजो (Corralejo) या लोकप्रिय कार्यक्रमात बैलांच्या झुंजीदरम्यान (Bull Fight) स्टेडियमचा तीन मजली स्टँड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बैलांच्या झुंजीदरम्यान स्टँड कोसळल्याचं दिसत आहे. बुल फाईट अचानक तीन मजली स्टँड कोसळला. यावेळी बैलांची झुंज सुरु होती. लोक झुंज पाहत असताना स्टँड कोसळला. यावेळी ढिगाऱ्याखाली शेकडो लोक फसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.


स्टँड कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये कोरलेजो नावाच्या लोकप्रिय कार्यक्रमादरम्यान शेकडो लोक बैलांची झुंज पाहण्याची मजा घेत आहेत. यावेळी अचानक स्टँडचे तीन मजले कोसळले आणि शेकडो पुरुष, महिला आणि लहान मुलं ढिगाऱ्याखाली अडकली.




 


या भीषण दुघर्टनेच्या आणखी एका ड्रोन फुटेजमध्ये लोक स्टँड पडल्यानंतर ढिगाऱ्यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर एक बैल रिंगणात फिरताना दिसत आहे. लोकांचा आरडाओरडा कानावर येत आहे. काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आले आणि ढिगाऱ्याखालील लोकांना बाहेर काढण्याच प्रयत्न केला.


काय आहे कोरलेजो कार्यक्रम?


पारंपारिक कोरलेजो कार्यक्रमात बैलांची झुंजीचं आयोजन केलं जातं. बोगोटाच्या नैऋत्येस 95 मैल अंतरावर असलेल्या एल एस्पिनल या गावात हा कार्यक्रम पार पडतो. दरवर्षी महापौर आणि परिसरातील खाजगी संख्या यांच्याकडून 29 जून रोजी सेंट पीटर यांचा उत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या