Christie Smythe on Martin Shkreli : मार्टिन श्क्रेली (Martin Shkreli) हा अमेरिकेचा खलनायक मानला जातो. मार्टिन श्क्रेलीचा अमेरिकत सर्वाधिक द्वेष केला जातो. त्याचं कारण म्हणजे यानं जीव वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची किंमत तब्बल 5000 टक्क्यांनी वाढवली होती. यामुळे अमेरिकेसह जगभरात त्याच्या व्यक्तीमत्वावर ताशेरे ओढले गेले. आता त्याची एक्सगर्लफ्रेंड क्रिस्टी स्मिथ (Christie Smythe) हिनं अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत यावर मार्टिन श्क्रेलीबाबत भाष्य केलं आहे. तिनं म्हटलं आहे की, 'अमेरिकत सर्वाधिक द्वेष केला जाणाऱ्या व्यक्तीसाठी मी माझ्या पतीला घटस्फोट दिला.'


'खलनायकासाठी पती आणि नोकरी सोडली'


स्मिथनं सांगितलं आहे की, नोव्हेंबर 2017 मध्ये क्रिस्टी स्मिथ हिनं तिच्या पतीला विवाह समुपदेशनासाठी राजी केलं होतं. याचवेळी तिची मार्टिन श्क्रेली यांच्यासोबत तुरुंगात भेट झाली. ब्लूमबर्गची पत्रकार क्रिस्टी स्मिथने मान्य केलं आहे की, तिनं मार्टिनला भेटण्यासाठी विवाह समुपदेशाला जाणं टाळलं. यावेळी ती एका वृत्तसंस्थेची कर्मचारी होती. मात्र, तरीही तिनं मार्टिनला भेटणं सोडलं नाही.'


स्मिथनं पुढे म्हटलं आहे की, 'मार्टिनसोबत भेट झाल्यानंतर ती समुपदेशनासाठी गेली होती. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी त्याच्या नात्याचा अंत झाला. अमेरिकेचा खलनायक बनलेल्या व्यक्तीसाठी मी माझा पती आणि नोकरी सोडली.' मार्टिन श्क्रेलीवरील सिक्युरिटीज फसवणुकीच्या गुन्ह्याची बातमी जगासमोर पहिल्यांदा ब्लूमबर्गची रिपोर्टर स्मिथ हिनेच आणली होती. मात्र नंतर मार्टिनसोबतच्या तिच्या संबंधांमुळे तिने तिची नोकरी सोडली.


श्क्रेलीनं जीवनावश्यक औषधाची किंमत 5000 टक्क्यांनी वाढवली होती


मार्टिन श्क्रेली 'फार्मा ब्रो' (Pharma Bro) या कंपनीचा मुख्य निधी व्यवस्थापक (Fund Manager) होता. त्याने सप्टेंबर 2015 मध्ये अँटीपॅरासीटीक (Antiparasitic) औषध डाराप्रिम (Daraprim) उत्पादनाचा परवाना मिळवला. यानंतर त्याने एका रात्रीत या औषधाची किंमत तब्बल 5000 टक्क्यांनी वाढवली अँटीपॅरासीटीक (Antiparasitic) औषध डाराप्रिम (Daraprim) हे जीवनावश्यक औषधांपैकी एक आहे. त्यामुळे श्क्रेलीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. श्क्रेलीनं डाराप्रिम अँटीपॅरासिटिक औषधाची किंमत 5,455 टक्क्यांनी (प्रति गोळी 13.50 ते 750 डॉलर) वाढवली होती.


सिक्युरिटीज फसवणुकीच्या गुन्ह्यात श्क्रेली दोषी


दरम्यान, मार्टिनच्या श्क्रेलीवर या प्रकरणाशी संबंध नसलेल्या सिक्युरिटीज फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांवर आणि सिक्युरिटीज फसवणूक करण्याचा कट रचल्याचा फेडरल कोर्टात आरोप करण्यात आला. याप्रकरणी कोर्टानं त्याला दोषी मानत सात वर्षे तुरुंगवास आणि 7.4 दशलक्ष डॉलर दंडाची शिक्षा सुनावली. तर दिवणी प्रकरणातही त्याला 64.6 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला.


महत्त्वाच्या इतर बातम्या