नवी दिल्ली : तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं आहे. तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण संबंध सुरु आहेत. अशातच तैवानसोबतही चीनच्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुरघोडी सुरु आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा करण्यात येत आहे की, तैवानकडून चिनी विमानाला अनेकदा चेतावणी दिली, तरिसुद्धा चिनी विमान तैवानच्या हवाई हद्दीतून बाहेर गेलं नाही. बराच वेळ हे विमान तिथेच घिरट्या घालत होतं. त्यामुळे तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं आहे. असं सांगण्यात येत आहे की, या घटनेत पालयट जखमी झाला आहे. जर मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेले दावे खरे ठरले तर चीन आणि तैवान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.


दरम्यान, चीन गेल्या काही दिवसांपासून तैवानच्या हवाई हद्दीत आपली लढाऊ विमानं पाठवत आहे. तैवानने चीनच्या कोणत्याही हल्ल्याला जोरदार प्रतिसाद देण्यासाठी आपली लष्करी क्षमता बळकट करण्यासाठी तयारी सुरु केली आहे.


भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं : CDS जनरल बिपिन रावत


चीनशी सुरु असलेल्या वाटाघाटीदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं आहे. भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं, असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं. कारण चीनशी आपल्याकडून धोका असल्याचं बघून पाकिस्तान त्याचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे कुणी जर चुकीचं साहस करुन आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, असं जनरल रावत म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या :