नवी दिल्ली : चीनशी सुरु असलेल्या वाटाघाटीदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं आहे. भारतीय सैन्यानं तयारीत राहायला हवं, असं जनरल रावत यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या तीनही सेनांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सनं तयारीत राहावं. कारण चीनबरोबर असलेल्या तणावाचा फायदा पाकिस्तान उचलू शकतो. त्यामुळे कुणी जर चुकीचं साहस करुन आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आपण जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, असं जनरल रावत म्हणाले.

जनरल रावत म्हणाले की, चीन ज्या पद्धतीनं रणनीतीनुसार आर्थिक आणि धोरणात्मक मदत पाकला करतंय हे पाहता आपल्याला मोठ्या प्रमाणावर तयारीत राहायला हवं.  सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की, जर त्यांनी पूर्व लडाखमधील भारत-चीन वादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. असं त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे लडाख दौऱ्यावर असलेले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आज फिल्ड कमांडर्सकडून स्थितीचा आढावा घेत आहेत. काल त्यांनी फॉरवर्ड लोकेशनचाही दौरा केला होता. याआधी बुधवारी वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी ईस्टर्न कमांडचा दौरा केला होता. सिक्कीम, आसाम, अरुणाचल, मेघालय या राज्याच्या सीमेवरील तयारीचा आढावा घेतला होता.


India-China Border Faceoff: तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लडाखच्या दौऱ्यावर, सीमेवरील तयारीचा आढावा

भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत.


काल, गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुख सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा देखील घेणार आहेत. लष्करप्रमुखांच्या दौऱ्याआधी  बुधवारी वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया यांनी पूर्व लडाखचा दौरा केला होता. वायुसेना प्रमुखांनी चीनच्या सीमेला लागून असलेल्या सिक्किम, असम, अरुणाचल, मेघालयमध्ये वायुसेनेच्या कॉम्बॅट यूनिट्सच्या आपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता.


भारत-चीनदरम्यान अधिकृत सीमेची आखणी नाही, त्यामुळे सीमावाद सुरूच राहणार : वांग यी 


भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष 
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे. 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री ही घटना घडली आहे. लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये ही झटापट झाली. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. याआधी 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर चीनचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या फ्लॅग मीटिंग सुरु आहे. मात्र त्यातच दोन्ही देशांमधील सैन्यांमध्ये झटापट झाल्याने तणाव पुन्हा वाढला आहे. दरम्यान झटापट झाल्याची अधिकृत माहिती भारतीय सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली आहे. मात्र यामध्ये जीवितहानी झाली आहे का, किंवा कोणत्या प्रकारचं नुकसान झालं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


काय म्हणाले होते चीनचे परराष्ट्र मंत्री
युरोप दौऱ्यावर असणारे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं होतं. वांग यी म्हटले होतं की, भारत-चीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या अधिकृत सीमांची आखणी झाली नसल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यापुढेही वाद सुरूच राहतील. पण चीन भारताशी असलेल्या सर्व वादांच्या मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढायला तयार आहे. त्यांनी हे वक्तव्य सोमवारी पॅरीसमधील ' फ्रेंच इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ' या संस्थेतील एका कार्यक्रमात केले. भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या मतभेदांचे संघर्षात रूपांतर न होण्यासाठी या दोन देशांच्या नेतृत्वामध्ये यापूर्वी एकमताने जे निर्णय झाले होते ते लागू करावेत, असेही ते म्हणाले. चीनचे भारत आणि जपानशी असलेल्या संबंधावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. परंतु पूर्व लडाखमध्ये चीनी लष्कराच्या घुसखोरीवर त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं.


भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष 
वांग यी यांनी पुढे म्हटलं होतं की, भारत-चीन संघर्षाकडे जगाचं लक्ष आहे. या दोन देशांदरम्यान आतापर्यंत कोणत्याही अधिकृत सीमांची आखणी झालेली नाही. त्यामुळं हे अशा प्रकारचे वाद भविष्यातही होत राहतील. परंतु चीनची भारतासोबत कोणत्याही वादावर चर्चेची तयारी आहे. याआधीही चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. त्यात दोन देशांत असलेले मतभेद बाजूला ठेवून द्विपक्षीय सहकार्यावर अधिक भर देण्याचेही ठरले आहे.