China-America : चीन (China) आणि अमेरिका (America) यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देश सातत्याने एकमेकांविरोधात वक्तव्ये करताना दिसत आहेत. आता भारतासोबतच्या संबंधांचा आणखी एक मुद्दा जोर धरू लागला आहे, याबाबत चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे आणि म्हटले की, अमेरिकेने भारतासोबतच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करू नये. पेंटागॉनच्या अहवालातही याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या अहवालात चीनच्या वक्तव्यांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, चिनी सैन्याला भारताला अमेरिकेशी जवळीक साधण्यापासून रोखायचे आहे. त्यासाठी चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु चीनला भारतासोबतच्या संबंधाबाबत अमेरिकेने हस्तक्षेप करणे पसंत नाही. 



अमेरिकेने आरोप केल्यावर चीन संतापला
पेंटागॉनच्या अहवालात, अमेरिकेने चीनवर आरोप केला आहे की 2021 मध्ये, चीनने (PLA) सीमेवर बेकायदेशीरपणे सैन्य तैनात केले. या अहवालात म्हटलंय, दोन्ही देशांच्या (चीन-भारत) चर्चा असमाधानकारक झाल्या आहेत. कारण दोन्ही देश सीमेवर आपापल्या भूमिकेतून विरोध करताना दिसत आहेत. भारत आणि चीन दोघेही इतर लष्करी सैन्य मागे घेण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु चीन किंवा भारत दोघांनीही या अटी मान्य नाहीत. अमेरिकेच्या आरोपानंतर चीन चिडला होता. पीआरसी (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) च्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना भारतासोबतच्या संबंधांमध्ये ढवळाढवळ न करण्याचा इशारा दिला आहे.


पेंटागॉनच्या अहवालात मोठा खुलासा


पेंटागॉनच्या एका अहवालात चीनबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्यामध्ये चीन वेगाने अण्वस्त्रांचा साठा वाढवत असल्याचं म्हटलं आहे. या अहवालात पुढील 12 वर्षांत चीनकडे 1500 हून अधिक अण्वस्त्रे असतील, असे सांगण्यात आले आहे. पेंटागॉन हे अमेरिकेचे संरक्षण विभाग आहे, ज्या अंतर्गत देशाच्या सुरक्षेशिवाय जगातील सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवते. या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, चीन अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांची क्षमता दुपटीने वाढ करतोय. तसेच चीन जमीन, समुद्र आणि हवेवर आधारित आण्विक शस्त्रांची संख्या वाढवत आहे. तसेच या अण्वस्त्रांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


China Nuclear Weapon: चीन मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांचा साठा तयार करतोय, भारताला सतर्क राहण्याची गरज? पेंटागॉनच्या अहवालात म्हटलंय..