नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमाभागात सुरु असणाऱ्या हालचाली पुन्हा एकदा साख्या जगाचं लक्ष वेधू लागल्या आहेत. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार चीननं तिबेट सीमेनजीक जगातील सर्वाच उंच रडारवर 5 जी सिग्नल बेस सुरु केला आहे. गनबाला रडार स्टेनशनवर चीननं इंटरनेट सेवा सुरु केली आहे. भारतासाठी ही माहिती आणि हे वृत्त महत्त्वाचं आहे, कारण गनबाला रडार स्टेशन भारत आणि भूटानसीमेनजीकच आहे.
चीनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार या टॉवरची उंची समुद्रसपाटीपासून 5374 मीटर इतकी असून, जगातील सर्वाधिक उंचीवर स्थित मॅन्युअली काम करणारं रडार स्टेशन म्हणून याची ओळख आहे. भारत- भूटान सीमेवरील तिबेटच्या नगार्जे काऊंटी येथे हे रडार स्थित आहे.
चीनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार चीनच्या लष्करातील सैनिकांना 5जी सेवा देण्यासाठी म्हणून मागच्याच वर्षई गनबालामध्ये असणाऱ्या खासगी सेक्टरच्या साथीनं या स्टेशनचं काम हाती घेण्यात आलं होतं. हे स्टेशन सुरु झाल्यानंतर सैनिकांना त्यांच्या रोजच्या जीवनातून काही निवांत क्षण मिळाले असता जगात, देशात आणि समाजात नेमकं काय घडत आहे याची माहिती मिळू शकेल आणि ते या मदतीनं सर्वांशीच जोडले जाऊ शकतात. चीननं सीमा भागात तैनात असणाऱ्या जवानांचं प्रशिक्षण आणखी सुकर पद्धतीनं व्हावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे.