Xi Jinping : कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे ( Communist Party of China Congress ) 20 वे अधिवेशन संपल्यानंतर शी जिनपिंग ( Xi Jinping )यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. चीनमध्ये (China), या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो.


तीन दशके जुनी राजवट बदलली
जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने पक्षाची तीन दशके जुनी राजवटही मोडीत निघाली आहे. चीनमध्ये 1980 नंतर राष्ट्रपतीसारख्या सर्वोच्च पदावर 10 वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला. मात्र, जिनपिंग यांना आणखी काही वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला. शी जिनपिंग हे सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. आपल्या नियुक्तीपूर्वीच शी जिनपिंग यांनी त्यांच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा चीनमध्ये सत्ता काबीज केली आहे. चीनमध्ये 20व्या CPC राष्ट्रीय काँग्रेसचा शनिवारी समारोप झाला, ज्यामध्ये 2,296 प्रतिनिधींनी 205 सदस्यीय केंद्रीय समितीची निवड करण्यात आली.


'पॉलिट ब्युरो' घेते राष्ट्रपतीं संदर्भातील निर्णय
जिनपिंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्यही आहेत. 25 सदस्यीय 'पॉलिट ब्युरो'कडून जिनपिंग यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणूनही निवड झाली. त्यांच्याकडे पुढील पाच वर्षांसाठी पक्ष आणि देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे पॉलिट ब्युरोमधून गायब होती
केंद्रीय समितीच्या सदस्यांच्या यादीतून अनेक नेत्यांची नावे वगळण्यात आली होती. यामध्ये ली किंग (67), नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष ली झांशु (72), चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे अध्यक्ष वांग यांग (67), माजी उपपंतप्रधान हान झेंग (67) यांचा समावेश आहे. हे सर्व नेते शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय स्थायी समितीचे सदस्य होते.


जिनपिंग यांच्या नावावर रेकॉर्ड
जिनपिंग या वर्षी सीपीसी प्रमुख आणि अध्यक्ष म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. पक्षाचे संस्थापक माओ झेडोंग यांच्यानंतर तिसऱ्यांदा सत्तेवर असणारे ते पहिले चिनी नेते ठरले आहेत. माओ त्से तुंग यांनी सुमारे तीन दशके चीनवर राज्य केले. नवीन पद मिळणे म्हणजे जिनपिंग यांचाही माओप्रमाणे आयुष्यभर सत्तेत राहण्याचा मानस आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.