Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. यातच रशियाचे युक्रेनवर बॉम्ब हल्ले देखील सुरूच आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, शनिवारी मोठा हल्ला करत मॉस्कोमधून 36 क्षेपणास्र डागण्यात आले. ते म्हणाले की, यापैकी काही क्षेपणास्त्रांनी वीज प्रकल्प आणि जल केंद्रांना लक्ष्य केले. त्यामुळे सुमारे 10 लाख लोकांना अंधारात जगावे लागत आहे. झेलेन्स्की पुढे म्हणाले की, मॉस्को जाणीवपूर्वक नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करत आहे.


दुसरीकडे रशियन अधिकाऱ्यांनी खेरसनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या लोकांना सोडण्याचे काम संथगतीने सुरू होते, मात्र युक्रेन येथील नागरिकांना लक्ष्य करू शकते, अशी भीती रशियाला  आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी सुरु झालेलं रशिया-युक्रेन युद्ध आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे.


रशिया अण्वस्त्रे वापरणार का?


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला हा संघर्ष संपताना दिसत नाही. युक्रेनवर रशियन हल्ल्यांचा परिणाम अधिक दिसू लागला आहे. रशियाने युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू केली आहे. यातच युक्रेन खंबीरपणे रशियन हल्ल्यांना तोंड देत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनेक मंचांवर युक्रेनवर अण्वस्त्रांच्या वापराकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर रशियाकडून युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता वाढली आहे, असं बोललं जात आहे.






एनरहोदरचे महापौर दिमित्रो ऑर्लोव्ह म्हणाले की, शहरातील वीज आणि पाणी केंद्रांना लक्ष्य करण्यात आले होते. युक्रेनच्या दक्षिण-मध्य प्रदेशात स्थित क्रिवी रिह येथील वीज प्रकल्प क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे खराब झाला. रशियन क्षेपणास्त्रांनी नागरी ठिकाणांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा हा परिणाम आहे. या हल्ल्यांसाठी रशियाला ड्रोनचा पुरवठा करणाऱ्या इराण या त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रावर कीवने जोरदार टीका केली आहे.


इराणचा निषेध


युक्रेनविरुद्ध युद्धात ड्रोन पुरवल्याबद्दल इराणचा अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी निषेध केला आहे. अशा प्रकारे युक्रेनवर ड्रोन हल्ले विनाशकारी ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसने गुरुवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, इराणचे सैन्य क्रिमियामध्ये ड्रोन हल्ले तसेच युक्रेनियन नागरिक आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करून रशियन सैनिकांना मदत करत असल्याचे पुरावे अमेरिकेकडे आहेत.