चीन (China) कडून भविष्यातील युद्धाची तयारी सुरु असल्याचं बोललं जातं आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी सैन्यात 3 लाख युवा सैनिकांची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या लष्करानं त्यानुसार सैनिकांसाठीचं साहित्य आणि संसाधने वाढवण्यास सुरुवात केली आहे. जिनपिंग यांनी सैन्य दलांना भविष्यात युद्ध जिंकण्यासाठी वेगानं आधुनिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार चिनी लष्करामध्ये 3 लाख सैनिकांची मेगा भरती करण्यात येणार आहे. 


राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) यांच्यातर्फे लष्करासंबंधित एक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत जिनपिंग म्हणाले की, भविष्यात युद्ध जिंकण्यासाठी चीनच्या लष्कराची प्रगती हीच गुरुकिल्ली आहे. चिनी सैन्याचा वार्षिक अर्थसंकल्प 209 अब्ज डॉलर्सचा आहे. यासह चिनी सैन्य संघटनात्मक सुधारणा आणि आधुनिक शस्त्रास्त्र प्रणालींसह आधुनिकीकरणावर भर देत आहे. 


चीनची सरकारी वृत्तसंस्था 'शिन्हुआ' (Xinhua) च्या रिपोर्टनुसार, जिनपिंग यांनी सांगतलं की, ''चिनी सैन्य म्हणजेच पीएलए ( People's Liberation Army) च्या 2027 साली होणाऱ्या शताब्दी वर्षाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी लष्करात सुधारणेची आवश्यकता आहे. लढणे आणि जिंकण्याची क्षमता बळकट करणे हे लष्कराचं पहिलं आणि शेवटचं ध्येय असलं पाहिजे.'' हाँगकाँगच्या एका मीडिया रिपोर्टनुसार, 'चिनी लष्करानं 3 लाख नव्या सैनिकांसाठी लागणारं साहित्य आणि संसाधने वाढवण्यास सुरुवात केली आहे.''


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha