Parag Agrawal : मुंबईकर पराग अग्रवाल यांची मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर' (Twitter) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्णी लागलीय. यानंतर सोशल मीडिया (Social Media) वर मजेदार मीम्सचा पाऊस पडला आहे. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)जॅक डोर्सी यांनी पदाचा राजीनामा दिला असून पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या मुख्य कार्यकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पराग अग्रवाल यांनी बॉम्बे आयआयटी 9IIT Bombay) मधून शिक्षण घेतलं आहे. पराग अग्रवाल यांनी 2011 मध्ये ट्वीटर कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 2017 मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) या पदावर त्यांची निवड झाली. त्यानंतर आता पराग यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदी निवड झाली आहे. 


भारतीय पराग अग्रवाल यांची 'ट्विटर'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर भारतीयांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स व्हायरल केल्या आहेत. वेगवेगळ्या बॉलिवूड चित्रपटातील आणि मालिकांमधील सीन्सचा वापर करत नेटकऱ्यांनी पराग अग्रवाल यांच्या संबंधात मीम्स तयार केल्या आहेत.


 






एका नेटकऱ्यानं 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील ओवाळणीच्या सीनसह पराग यांचं स्वागत केलंय.






एका नेटकऱ्यांनं म्हटलंय की, जगात भारतीयांचं कतृत्व मोठं आहे.










जगभरातील मोठ्या तंत्रज्ञानाविषयक कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय आहेत. यामध्ये मायक्रोसॉफ्ट (Microsoft)चे सत्या नडेला, गुगल (Google) चे सुंदर पिचई, आयबीएम (IBM)चे अरविंद कृष्ण, अ‍ॅडोब (Adobe)चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव आता या यादीत जोडलं गेलंय.