China Covid19 Update : भारतासह जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने (China Coronavirus Outbreak) वाढताना दिसत आहे. शुक्रवारी चीनच्या चेंगडू शहरात कोरोना विषाणूचे 200 हून अधिक कोरोना रुग्णांची झाली आहे. या शहरात लॉकडाऊन लागू करण्यात (China Impose Lockdown)आलं आहे. चेंगडू प्रशासनाने 21 दशलक्ष नागरिकांना घरी बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनानं सूचना जारी करत कोविड चाचण्यांवर भर देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या (Mass Covid19 Testing) केल्या जात आहेत.
डालियानमध्येही लॉकडाऊन
स्थानिक आरोग्य प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, चीनच्या ईशान्येकडील दालियान शहरात गुरुवारी 100 हून अधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दालियान शहराची 60 लाख लोकसंख्या आहे. मंगळवारपासून डॅलियनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत शहरात लॉकडाऊन लागू असेल. परिस्थिती पाहता पुढील उपाययोजना केल्या जातील.
बीजिंगमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी
चीनची राजधानी बीजिंग कोरोना विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडताना दिसत आहे. बीजिंगमध्ये सध्या कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, सरकारने राजधानी बीजिंगमध्ये राहणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. यासोबतच नागरिकांना कोविड चाचणी करण्याचं आवाहन केलं जातं आहे.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. चीनमधील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून जास्तीत जास्त कोविड चाचण्या करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे. आरोग्य प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या जात आहेत .
चीनचे 'झिरो कोविड' पॉलिसी
कोविडचा वाढता संसर्ग पाहता चीन सरकार अलर्टवर आहे. चीन सरकारकडून अत्यंत सावधगिरीने ‘झिरो कोविड’ पॉलिसी लागू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने निर्बंध, लसीकरण आणि उत्तम वैद्यकीय उपाययोजना यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
China Corona : शांघायमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात 24 हजारांहून अधिक रुग्ण, अन्नधान्याचीही टंचाई