Covid Surge: 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण नोंदवल्या गेलेल्या चीनमध्ये कोव्हिड संकट पुन्हा गहिरं बनलंय. नव्या व्हेरिअंटच्या शिरकावाने चीनची आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. चीनमध्ये सुपरफास्ट स्पीडने वाढणारी कोव्हीड रुग्णसंख्या जगाची डोकेदुखी वाढवणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. ब्लूमबर्गच्या नव्या रिपोर्ट्सनुसार जगाचं टेन्शन पुन्हा एकदा वाढणार आहे. ब्लूमबर्गच्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये एका दिवसात तब्बल 10 लाख कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. तर दररोज पाच हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.
 
ब्‍लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये लंडनमधील एका एनाटिक्सि फर्म एयरफिनिटी लिमिटेडच्या आकड्यांचा हवाला दिला आहे. या रिपोर्ट्समध्ये झिरो कोविड नितीला हटवल्यानंतर ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट अधिक वेगानं पसरत आहे. त्यामुळे पुढील एक महिन्यात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या 3.7 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तर मार्चमध्ये ही संख्या 4.2 मिलिअनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. 


पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने कहर केला आहे. हॉस्पिटल्स पेशंटने ओव्हरफ्लो झाली आहेत.  बेडस् नाहीत...औषधं नाहीत...डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांवर जमीनीवरच उपचार करण्याची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन BF 7 व्हेरिअंटने चीनमध्ये थैमान घातलंय. चीनमध्ये रोजच्या रोज शेकडो लोकांचा मृत्यू होतोय...रुग्णालयात मृतदेह ठेवायलाही जागा शिल्लक नाही. वाढत्या मृत्युंमुळे अंत्यसंस्कारांसाठीही लांबच लांब रांगा लागल्यात. येत्या दोन ते तीन महिन्यांत चीनचे 80 कोटी नागरिक कोरोनाच्या विळख्यात येण्याची भिती तज्ज्ञांनी वर्तवलीये. या धोकादायक आकडेवारीचा विचार करता कोरोनाचा हा नवा अवतार फक्त चीनच नाही तर अख्ख्या जगासाठी धोक्याची घंटा आहे..


जेव्हा कुणी आजारी असतं तेव्हा ती व्यक्ती रुग्णालयात दाखल होते. बिजींगमधली सध्याची परिस्थिती आणि आरोग्य यंत्रणा योग्य असली तरी चीनच्या इतर भागातली परिस्थिती भयावह आहे. जर लोकांवर घरीच उपचार करणं शक्य झालं नाही तर चीनची आरोग्यव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भिती आहे.  नव्या व्हेरिअंटच्या हल्ल्यामुळे चीनची आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. सध्या चीनचं सरकार लाट आटोक्यात आणण्यासाठी पोक्सलोविड या औषधाची मोठ्या प्रमाणात आयात करतंय. पण संक्रमण आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताच आहे. 


NBR च्या रिपोर्टनुसार चीनमधला संक्रमाणाचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या हिवाळ्यात चीनमध्ये 8 कोटींपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण होण्याची भिती आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य़ आयोगाच्या माहितीनुसार सध्या चीनमध्ये एका संक्रमीत व्यक्तीपासून 16 ते 18 जणांना कोरोनाचा धोका आहे. चीनच्या शांघायमध्ये वेगाने कोरोना पसरतोय. त्यामुळे शांघायमधून बाहेर पडण्यासाठी अनेकजण विमानतळ आणि रेल्वेस्थानकांवर गर्दी करतायेत. चीनमध्ये आलेली कोरोनाची ही नवी लाट जगभरात पसरण्याचा अंदाजही व्यक्त होतोय. 11 नोव्हेंबरला चीनच्या सरकाने लॉकडाऊन पॉलिसी शिथील केल्यानंतर रुग्णसंख्या वाढीचं निरीक्षण आहे. 
लॉकडाऊन पॉलिसी शिथील झाल्याने चीनमधून विविध देशातल्या विमानप्रवासालाही ग्रीन सिग्नल मिळाला


डिसेंबर महिन्यात चीनमधून विविध देशांत दोन हजार विमानं गेली. प्रत्येक विमानात किमान 150 प्रवासी गृहित धरली तर या हिशोबाने चीनमधून किमान तीन लाख लोकांनी जगभरात प्रवास केलाय. या आकडेवारी वरुन नव्या व्हेरिअंटच्या जगभरातल्या संक्रमणाचा धोका लक्षात येऊ शकतो. पहिल्या लाटेत चीनच्या वुहान शहरात 17 नोव्हेंबर 2019 साली कोरानाचा पहिला रुग्ण नोंदवला गेला. आणि बरोबर तीन वर्षांनी 19 डिसेंबर 2022 ला कोरोनाच्या नव्या लाटेतल्या पहिल्या मृत्यूची माहिती चीनने जगाला दिलीये. त्यामुळे पुन्हा एकदा चीन संपूर्ण जागाला कोरोनाच्या संकटात ढकलण्याची भिती व्यक्त होतेय.