China Covid Surge: तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 साली जेव्हा संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत होता तर दुसरीकडे चीनमध्ये (China) कोरोनाचा (Corona)  प्रसार होत होता आज तीन वर्षांनंतर चीनमध्ये तीच स्थिती उद्भवली आहे.  कारण चीनमध्ये  कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरवात केलीये.  चीनमध्ये कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये. गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्ये कोरोनाचं थैमान सुरुच आहे. एका रिपोर्टनुसार  50 लाख नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. 


चीनच्या बिजिंगमध्ये कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे.  बीजिंगमध्ये कोविड रुग्णसंख्येत  झपाट्याने वाढ होत आहे.  बीजिंगच्या स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये  फक्त बीजींगच नाही तर अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने  वाढत आहे.


चीनमध्ये या शहराला पुन्हा कोरोनाचा विळखा 



  • ग्वांगझाऊ

  • जीनान

  • झियांगतान

  • झेंगझोऊ

  • हूबेई 

  • हेनान

  • जिआंगसू 

  • लान्झू

  • लिजिआंग

  • युन्नान

  • लुओयांग


चीनमध्ये आतापर्यंत 66 लाखाहून अधिक  कोरोनाचे बळी गेले आहेत. तीन वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोनाने जसं थैमान घातलं होतं तसाच कोरोनाचा पुन्हा एकदा विकोप व्हायला सुरुवात झाली आहे.  चीनने 7 डिसेंबरपासून दहा सूत्रीय नोटीस जारी करुन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीनमध्ये पुन्हा एकदा टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. 11 डिसेंबरला 22 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेण्यासाठी आले होते मात्र आठवडाभरातच 16 पटीने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.  त्यामुळे येत्या काळात चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती कशी हाताबाहेर जाण्याची शक्यता 
IHME (Institute for Health Metrics and Evaluation) ने वर्तवली आहे. 


रिपोर्टनुसार 



  • 50 लाख रुग्ण कोरोना  विळख्यात अडकण्याची शक्यता

  • 2023  मध्ये चीनच्या लोकसंख्येच्या 60 नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता 

  • कोरोनामुळे चीन आर्थिक संकटात सापडण्याचीही शक्यता 


तज्ज्ञांच्या माहितीनुसार चीनमध्ये जवळपास 9 लाख 64 हजार 400 जणांचा  कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे.  तर जून 2023 पर्यंत दहा लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे.  तर अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की,  डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत कोरोना चीनच्या सर्व राज्यांमध्ये पसरण्याची शक्यता आहे.