Karachi International Airport : कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्याप डी-कंपनीच्या (D-Company) ताब्यात असल्याचं एनआयएच्या तपासात समोर आले आहे. सलीम फ्रूट (SALIM FRUIT) याची पत्नी शाझिया यांची एनआयएनं (NIA) चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये कराची विमानतळावरावर (Karachi International Airport) डी कंपनीचं वर्चस्व कसं आहे. त्याशिवाय दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या साथीदारांना भेटण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये अवैधरित्या पोहोचण्याच्या मार्गाबद्दल एनआयएच्या तपासात माहिती समोर आली आहे. 


छोटा शकीलच्या मुलींच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सलीम फ्रूटचे कुटुंब बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेले होते. त्यात सलीम फ्रूटही छोटा शकीलला भेटण्यासाठी आणि त्याच्या मुली झोया आणि अनमच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी पोहोचला होता, अशी माहिती सलीम फ्रूट याची पत्नी शाझिया यांनी एनआयएला जबाबात दिली आहे.  


डी-कंपनीच्या सिंडिकेट आणि टेरर फंडिंगची चौकशी करणार्‍या एनआयएला चौकशीदरम्यान अनेक महत्वाची माहिती मिळाली आहे. कराची विमानतळ डी-कंपनीच्या ताब्यात आहे. तेथून दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील आणि त्याचे कुटुंबीय डी-कंपनीसोबत व्यवसाय करण्यासाठी आलेल्या लोकांच्या पासपोर्टवर शिक्के लावले जात नाहीत. त्यांना भेटणासाठी आलेल्या पाहुण्यांना कराची विमानतळाच्या आतील व्हीआयपी लाऊंजमधून रिसिव्ह केले जाते. त्यानंतर थेट दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या घरी नेले जाते. कराची विमानतळावरील डी कंपनीचे वर्चस्व यावरून लक्षात येते की पाहुणे परतले की त्यांना सोडायलाही पाठवलं जाते. इमिग्रेशन क्लिअरन्सशिवाय थेट दुबई किंवा इतर गल्फ देशांमध्ये पाकिस्तानच्या कनेक्टिंग फ्लाइटने कुठल्या स्टॅम्पशिवाय पाठवलं जाते.  दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकील यांना भेटण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये पोहोचण्याचा हा अवैध मार्ग आहे. टेरर फंडिंगच्या तपासात गुंतलेल्या एनआयएला छोटा शकीलचा मेहुणा आणि अटक आरोपी सलीम कुरेशी उर्फ ​​सलीम फ्रूटची पत्नी यांच्या चौकशीदरम्यान या मार्गाची माहिती मिळाली.


एनआयएच्या चौकशीत सलीम फ्रूटच्या पत्नीने दिलेल्या जबानीत छोटा शकीलची पत्नी नजमा ही त्याची बहीण आणि छोटा शकीलची मुलगी झोया ही त्याची भाची असल्याचे सांगितले. सलीम फ्रूटच्या पत्नीने एनआयएच्या चौकशीत कबुली दिली की, ती कराचीतून पाकिस्तानात गेली होती, त्यात त्यांच्याबरोबर सलीम फ्रूटनेही प्रवास केला होता.  तपास यंत्रणांच्या नजरा टाळून छोटा शकीलला भेटण्यासाठी आणि त्याची मुलगी झोया आणि अनमच्या लग्नाला हजर राहण्यासाठी ती दोनदा पाकिस्तानला परिवारासोबत गेली होते.


एनआयएला दिलेल्या जबाबात सलीम फ्रूटची पत्नी शाझियाने सांगितले की, 2013 मध्ये सलीम फ्रूटची पत्नी छोटा शकीलची मुलगी झोयाच्या एंगेजमेंटसाठी दुबई ते पाकिस्तानच्या कनेक्टिंग फ्लाइटने कराचीला गेली होती. सलीम फ्रूटचे कुटुंब कराची विमानतळावर पोहोचले, जिथे त्यांच्या पासपोर्ट न तपासता आणि शिक्का न मारता प्रवेश देण्यात आला. छोटा शकीलचा एक माणूस विमानतळावर त्यांना घेण्यासाठी आला होता. ज्याने त्यांना रिसिव्ह केले आणि त्यांना थेट छोटा शकीलच्या घरी नेले. मुलीच्या एंगेजमेंटमध्येही ते सर्वजण हजर झाले.  


त्याचप्रमाणे, 24 मार्च 2014 रोजी, सलीम फ्रूटची पत्नी, छोटा शकीलची धाकटी मुलगी अनमच्या लग्नात सहभागी होण्यासाठी शाझिया पाकिस्तानी एअरलाईनद्वारे आपल्या मुलांसह कराची विमानतळावर पोहोचली होती. पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेली, जिथे त्यांना कराचीत उतरल्यानंतर थेट छोटा शकीलच्या घरी नेण्यात आले. विमानतळावर जवळपास 5 ते 6 दिवस थांबले होते, तिथे सामील झाल्यानंतर ते कराची विमानतळावरून न थांबता दुबईला पोहोचले आणि दुबईहून परत भारतात आले. त्यानंतर 18 सप्टेंबर 2014 रोजी छोटा शकीलची मुलगी झोया हिच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सलीम फ्रूटने त्याच दिवशी मुंबई ते कराची आणि कराची ते रियाध तिकीट बुक केले. सलीम फ्रूट आणि त्यांची पत्नी आणि मुलांनी पुन्हा एकदा 13.30 वाजता फ्लाइट घेतली. 14.50 ला कराचीला पोहोचले, कराचीमध्ये त्याला स्टॅम्पशिवाय पुन्हा प्रवेश मिळाला. छोटा शकीलच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर, 19 सप्टेंबर 2014 रोजी, सलीम फ्रूट सकाळी 07.10 वाजता रियाधला पोहोचले, या दरम्यान छोटा शकील आणि डी कंपानीचा लोकासोबत तो सुमारे 17 तास होता.