Car Prices in Pakistan : सध्या पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे, ज्याचा परिणाम तेथील ऑटोमोबाईल क्षेत्रावर स्पष्टपणे दिसून येतो. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असून कार खरेदी करणे हे अवघड स्वप्न झालं आहे. पाकिस्तानमध्ये कारच्या किमती किती प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यामागील कारणे काय आहेत ते समजून घेऊया.
भारतात अल्टो 3.99 लाखांपासून, पाकिस्तानात 23.31 लाख रुपयांपासून किंमत सुरू
पाकिस्तानमध्ये कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत तर भारतात त्याच गाड्या खूपच कमी किमतीत उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, मारुती सुझुकी वॅगनआर, ज्याची सुरुवातीची किंमत भारतात 5.54 लाख रुपये आहे, पाकिस्तानमध्ये 32.14 लाख रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे Suzuki Alto भारतात 3.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे, तर पाकिस्तानमध्ये त्याची किंमत 23.31 लाख रुपयांपासून सुरू होते.
- Suzuki Alto ची किंमत 23.31 लाख रुपयांपासून सुरू होते.
- सुझुकी स्विफ्टची किंमत 47.19 लाख रुपयांपासून सुरू होते.
- टोयोटा फॉर्च्युनरची किंमत 1.45 कोटी रुपये आहे.
- होंडा सिटीची किंमत 46.5 लाख रुपये आहे.
- टोयोटा कोरोलाची किंमत 62 लाख रुपयांपासून सुरू होते.
- महिंद्रा थारची किंमत 28 लाख रुपयांपासून सुरू होते.
- Wagon R VXR ची किंमत 26.29 लाख रुपये आहे.
- Wagon R AGS मॉडेलची किंमत 30.59 लाख रुपये आहे.
भारत आणि पाकिस्तान; किंमतीतील फरक
Suzuki Swift भारतात 6.49 लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर पाकिस्तानमध्ये त्याची सुरुवातीची किंमत 47.19 लाख रुपये आहे. टोयोटा फॉर्च्युनर भारतात 33.43 लाख रुपयांना उपलब्ध आहे, तर पाकिस्तानमध्ये ही कार 1.45 कोटी रुपयांना उपलब्ध आहे. Honda City बद्दल बोलायचे झाले तर ते भारतात 11.86 लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते, तर पाकिस्तानमध्ये त्याची किंमत 46.5 लाख रुपये आहे.
पाकिस्तानमध्ये कार महाग का आहेत?
पाकिस्तानमध्ये कारच्या वाढत्या किमतीला अनेक कारणे जबाबदार आहेत. आर्थिक अस्थिरता आणि अनियंत्रित महागाईमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. पाकिस्तानी रुपया सातत्याने घसरत असल्याने आयात महाग झाली आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये स्थानिक उत्पादन मर्यादित असल्याने उत्पादन खर्चही खूप जास्त आहे. पाकिस्तानमधील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी ऑपरेशनल समस्या आणि सरकारी समर्थनाच्या अभावामुळे त्यांचे कारखाने आणि आउटलेट बंद केले आहेत. याचा परिणाम गाड्यांच्या उपलब्धतेवरही झाला असून सर्वसामान्यांना कार घेणे अवघड झाले आहे. एकूणच, चलनवाढ, कमकुवत चलन आणि ऑटोमोबाईल उद्योगातील समस्यांमुळे पाकिस्तानमध्ये कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.