British Influencer Fenella Fox Income : लोक पैसे कमावण्यासाठी कधी काय करतील काही सांगता येत नाही. काही लोक दिवसभर घाम गाळून पैसे कमावतात, तर काही जण एसीत बसून. काही जण हातांचे तर काही पायांचे फोटो काढूनही पैसे कमावतात. एक ब्रिटीश तरुणीही अशाच काहीशा विचित्र पद्धतीने पैसे कमावते. युकेमधील महिला तिच्या अंडरआर्म्सच्या केसांपासून करोडोंची कमाई. हो तुम्ही वाचताय ते खरं आहे. ही महिला तिच्या शरीरावर विशेषत: काखेतील केसांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यामधून वर्षभरात करोडोंची कमाई करते.


काखेच्या केसातून 8 कोटींची कमाई


तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही महिला अंडरआर्म्सच्या फोटोंमधून भरपूर कमाई करते. यामुळेच तिला चांगली प्रसिद्धीही मिळाली असून ती ब्रिटीश इन्फ्लुएन्सर (British Influencer) बनली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचं नाव फेनेला फॉक्स (Fenella Fox) असं आहे. काखेच्या केसांमुळे ही महिला वर्षाला सुमारे दहा लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 कोटी रुपये कमवते. तिने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती उघड केली आहे.


'या' कारणासाठी केसांचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली


फेनेला फॉक्सने शरीरावरील केसांचे फोटो पोस्ट करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तिने सांगितले की. तिने सात वर्षांपूर्वी तिच्या शरीराच्या केसांची फोटो ऑनलाइन पोस्ट करायला सुरूवात केली. याचं कारण म्हणजे महिलांवर लादलेल्या सौंदर्य मानकांबाबतची चिढ. महिलांच्या सौंदर्यासाठी कोणतीही मानकं नसावीत, असं तिचं मत आहे. फॉक्सने दावा केला आहे की, ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दरमहा 9,500 डॉलर म्हणजे दरमहा 7 लाख आणि वर्षाला सुमारे 8 कोटी रुपये कमवते. सोशल मीडियावर तिचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 




बिकनीमध्ये फोटोशूट


मॉडेलिंग कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी फॅनेलाने एक शक्कल लढवली आणि बिकनीमध्ये फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. शरीरावरील केस दाखवत बिकनी फोटोशूटमुळे तिचे फॉलोअर्स वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे ती काही दिवसांतच बॉडी पॉजिटिव्ह इन्फ्लुएंसर म्हणून नावारुपाला आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Human Barbie : आधी लिंग बदललं, नंतर बनली 'बार्बी डॉल'... परीहून सुंदर दिसण्यासाठी महिलेनं स्वतःवर खर्च केले 10 कोटी, तरी भरलं नाही मन